Viral Video : वाघ, सिंह, चित्ता हे शब्द कानावर जरी पडले तरी अंगावर काटा येतो. वाघ, चित्ता, सिंह यापैकी कोणीही तुमच्या समोर आला तर तुम्ही काय कराल? सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण चक्क चित्ताबरोबर सेल्फी काढताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच हा आश्चर्यचकीत करणारा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना विश्वास बसणार नाही.

चित्ताबरोबर सेल्फी

हा व्हायरल व्हिडीओ एका शेतातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरण चक्क चित्ताबरोबर सेल्फी काढताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तरुण हातात फोन घेऊन सेल्फी काढत आहे आणि त्याच्या पायाच्या शेजारी चक्क चित्ता बसला आहे. विशेष म्हणजे चित्ता सुद्धा शांतपणे सेल्फी काढताना दिसतो. सुरूवातीला व्हिडीओ पाहताना तुम्हाला वाटेल की हा तरुण कुत्र्याबरोबर सेल्फी काढतोय पण नंतर नीट पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की हा कुत्रा नव्हे तर चित्ता आहे. व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. काही लोकांना विश्वास बसणार नाही की इतक्या शांतपणे हा तरुण चित्ताबरोबर सेल्फी कसा काढतोय.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही : VIDEO : १०० किमीचा वेग, ११००० व्होल्टेज वायर अन्…; तरुणाने ट्रेनच्या छतावर झोपून धोकादायक स्थितीत केला प्रवास

ghantaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सेलिब्रेटी आहे भाऊ” हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेक युजर्सनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही त्याची शेवटची सेल्फी आहे” तर एका युजरने लिहिलेय, “हे भारतातच होऊ शकते” आणखी एका युजरने लिहिलेय, “चित्ताला वाटले असेल की आता लोकांना त्याची भीती वाटत नाही”