Viral video: तुमच्याकडे पैसा असो वा नसो. मदतीची वृत्ती असली की कोणत्याही स्वरुपातलं दान आपल्या हातून घडतं. मनाची श्रीमंती हाच खरा दागिना. दातृत्वाची वृत्तीच नसेल तर कितीही पैसा तुमच्याकडे येवो, तो गरजूपर्यंत पोहोचत नाही. ना एखादं पुण्याचं काम तुमच्या हातून होतं… याउलट दातृत्व असेल तर एखाद्याच्या संकटकाळी तुम्ही आपोआप धावून जाता. या कठीण स्थितीत एखाद्याला केलेली थोडीशी मदत एखाद्यासाठी सर्वात मोठी ठरते. आयुष्य बदलवणारी ठरते. अशी व्यक्ती तुम्हाला देवही मानू शकते. अशाच एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याच्या मनाची श्रीमंती पाहायला मिळाली.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर एका बैलगाडीतून एक शेतकरी ऊस घेऊन जात आहे. यावेळी या बैल गाडीत या शेतकऱ्याची बायको, मुलं असं संपूर्ण कुटुंब आहे. यावेळी एक तरुण गाडीवरुन येतो आणि या शेतकरी राजाला एक ऊस द्या ओ खायला असं म्हणतो, आणि पुढच्याच क्षणी कसलाही विचार न करता हा शेतकरी सहज ऊस तोडून या तरुणाच्या हातात देतो. पुढे हा तरुण शेतकऱ्याचे आभार मानून निघून जातो. शेतकऱ्याएवढं मोठं मन आजकालच्या जमान्यात कुणाचंच पाहायला मिळणार नाही. प्रत्यक गोष्टीत स्वत:चा फायदा आणि स्वार्थ बघणाऱ्या जगात शेतकरीच एक आहे जो मनाची श्रीमंती दाखवत सगळ्यांना खुल्या हाताने देत जातो.

उभ्या जगाचा पोट भरणारा पोशिंदा उपाशी राहतो. खऱ्या अर्थानं ज्याच्या जीवावर देशाची अर्थव्यवस्था बळकट होऊन उभी आहे, त्याच माझ्या शेतकऱ्याच्या घरात मात्र सदानकदा अंधार दाटून येतो, आलेली दिवाळी त्याच दिवाळ काढल्याशिवाय राहत नाही, कर्ज दिलेला सावकार शेतकऱ्याला विकत घेतल्याचा आव आणतो.

.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “बापरे जीव जाईल तिचा” मुंबई लोकलमध्ये झिंझ्या पकडत महिलांची भयंकर मारामारी; VIDEO पाहून सांगा चूक कुणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ majalgaon_cha_statuswala नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये, मोठ्यांचं बघावं धन अन् गरिबाचं बघावं मन असा आशय लिहला आहे. यावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकदम बरोबर, अशी श्रीमंती कुठेच बघायला मिळत नाही अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.