Maharashtra lehenga Refund Incident Viral: महाराष्ट्रच्या कल्याणमधून धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एका माणूस दुकानातील लेहेंगा(घागरा) चाकूने फाडताना दिसत आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हिडीओमधी माणूस भावी नवरदेव असून त्याने भावी नवरीचा लेहेंगा फाडला आहे. न नक्की काय घडलं की रागाच्या भरात त्याने असे पाऊल उचलले हे जाणून घ्या.
भावी नवरदेवाचा दुकानात झाला वाद
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणाने आपल्या भावी नवरीसाठी लेहेंगा खरेदी केला होता जेव्हा नवरीला तो लेहेंगा आवडला नाही तेव्हा तो दुखी होऊन शोरूममध्ये परत देण्यास गेला. पण तेथील दुकानाच्या मालकाने लेहेंगा परत घेण्यास नकार दिला आणि रिफंड देण्यास देखईल नकार दिला. व्यक्ती आधीपासून दुखी होता त्यामुळे रागाच्या भरात त्याने दुकानातच तो लेहेंगा चाकूने अत्यंत वाईट पद्धतीने फाडला अन् दुकानदाराला धमकी देखील दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नवरीला आवडला नाही लेहेंगा, दुकानदाराने दिले नाही पैसे परत
अहवालानुसार, त्या माणसाच्या होणाऱ्या पत्नीने तो लेहेंगा त्या दुकानातून खरेदी केला होता पण तीला तो आवडला नव्हता. त्यामुळे तो परत करून पैसे मागितले. पण दुकानदाराने जेव्हा त्यासाठी नकार दिला तेव्हा हा धक्कादायक प्रकार घडला.
नवरदेवाने दुकानातच फाडला लेहेंगा!
दुकानदाराला दिली धमकी
सुमित सयानी नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने १९ जुलैरोजी दुकानातील कर्मचाऱ्यांसमोरच हा लेहेंगाफाडला आणि त्यांना धमकी दिली. त्याने दुकानदाराला धमकी देताना म्हटले की, “तुलाही अशा प्रकारे फाडले जाईल. मला माझे पैसे परत दे.”
व्हिडीओमध्ये सयानी दुकानातील कर्माचाऱ्यांबरोबर वाद घालताना आणि चाकू काढून लेहेंगा फाडताना दिसत आहे. त्यानंतप ब्लाऊज उचलतो आणि लेहेंगा फेकून निघून जातो. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एकाने कमेंट केली की,”ट्रेंड्स फॉलो करणे आणि दिखावा करण्याच्या नादात लग्न हा व्यवसाय झाला आहे.” लोकांना त्याची जाणीव देखील नाही. तुम्हाला अशा लेहेंगा घेण्याची गरज का आहे जो तुम्ही काही वेळाच घालणार आहात. यात अडकण्यापेक्षा भविष्यातील सुट्यांसाठी बचत करा.