टेक्सासमध्ये एका फायटर जेट विमानाला अपघात झाल्याचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिलिटरी बेसच्या विमानतळावर हे विमान रनवेवर उतरताच अचानक कोसळलं. F-35B हे विमान रनवेवर उतरत असतानाच चाकं जमिनीवर आदळली. त्यानंतर विमान थोड्या उंचीवर उडालं आणि थेट रनवेवर कोसळलं. पण विमानातील पायलटने क्षणाचाही विलंब न लावता पॅराशूटच्या साहय्याने स्वत:ला बाहेर फेकलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अमेरिकन सरकारचा वैमानिक हे विमान आकाशात उडवत होता. विमानाला अपघात झाल्यानंतर रनवेवरून विमान थोड्याफार उंचीवर हवेत उडालं आणि थेट जमिनीवर कोसळलं. त्यानंतर पायलटने पॅराशूटची मदत घेत स्वत:ला सुखरुप बाहेर काढलं, अशी माहिती पेंटागॉनचे प्रवक्ते पॅट रायडर यांनी दिली आहे. या धक्कादायक घटनेबद्दल पोलीस अधिकारी ख्रिस कुक यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. “विमान दुर्घटना झाल्यानंतर आम्ही तातडीनं लॉकहीड मार्टिन आणि नेवल एअर स्टेशनला भेट दिली. विमानाचा पायलट वाचला असून त्याची तपासणी केली जात आहे.” असं कुक यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.

नक्की वाचा – राजा असाल तरच ‘महाराजा’ मध्ये होईल शाही थाट, १९ लाख रुपये तिकिट असणाऱ्या ट्रेनची खासीयत माहितेय का? पाहा video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इथे पाहा व्हिडीओ

या विमानाच्या अपघाताचा थरारक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. विमान आकाशात भरारी घेत असताना रनवेवर उतरतं. पण त्याचवेळी अचानक विमानाची चाके जमिनीवर आदळतात आणि ते विमान पुन्हा काही अंतरावर हवेत उडतं. मात्र, पायलटचा विमान उतरवण्याचा अंदाज न आल्याने ते थेट जमिनीवर कोसळतं. त्यानंतर पायटल पॅराशूटच्या मदतीने विमानातून बाहेर पडतो. अंगावर काटा आणणारी ही सर्व दृष्य कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.