फिनलँड देशाच्या बेरोजगार तरुण तरुणींना नववर्षांत आनंदाची बातमी देऊन येथल्या सरकारने खूश केले. कारण या देशातील बेरोजगारांना दरमहा सरकार ५८७ डॉलर म्हणजे जवळपास ४० हजार रुपये भत्ता देण्याचे सरकारने ठरवले आहे.
VIRAL VIDEO : भाऊ माझा पाठीराखा
फिनलँडमधील तरूण बेरोजगांराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी त्यांना एवढा मोठा भत्ता देण्याचे सरकारने ठरवले आहे. आणि अशाप्रकारे एवढा मोठा बेरोजगार भत्ता देणारा युरोपमधाला फिनलँड हा पहिला देश ठरला आहे. सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग करण्यात येणार आहे. यासाठी २ हजार बेरोजगांरांची निवड सरकारने केली आहे. बेरोजगारीमुळे गरीबी वाढते आहे हिच दूर करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. अर्थात काही निकष ठरवूनच या बेरोजगार तरूणांची निवड करण्यात आली आहे. सध्या फिनलँडची लोकसंख्या ही ५५ लाख होती. यातील २ लाख ३३ हजार जनता ही बेरोजगार आहे. तर ज्यांना नोकरी आहे त्यांचे सरासरी मासिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आसपास आहे. म्हणूनच इथल्या बेरोजगांरांची संख्या कमी व्हावी यासाठी फिनलँडने बेरोजगार भत्ता देण्याचे ठरवले आहे. पण यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहे. सरकारकडून देण्यात येणा-या पैश्यांचे नागरिक काय करणार याचा हिशोब देणेही त्यांना अनिवार्य असणार आहे. १ जानेवारी २०१७ पासून हा भत्ता सुरू करण्यात आला.