काही जणांना मासेमारी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी सुट्टीचा दिवस मस्तपैकी मासे पकडण्यात घालवतात. परंतु मासे पकडणं हे दिसतं तितकं काही सोपं नाही. यासाठी फारच धैर्य लागतं. काही वेळेस तर तासंतास पाण्यात गळ टाकून बसावं लागतं. त्यामुळे एकदा का मासा हाती लागला की जणू युद्ध जिंकल्याचा आनंद मिळतो. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओध्ये मासे पकडण्यासाठी नदीपात्रात टाकलेल्या गळाला चक्क सहा फुट लांबीची मगर लागली. त्यामुळे घाबरलेल्या त्याने गळासह दोराच सोडून दिलाय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती बोटीत उभा राहून मासे पकडत आहे, मासे पकडण्यासाठी त्याने पाण्यात गळ टाकला आहे. मासा गळाला कधी अडकतो याची वाट बघत असतानाच काहीतरी गळाला अडकल्याचे त्याला कळतं आणि गळ वर खेचण्याचा प्रयत्न सुरु होतो. मात्र गळाला लागलेला मासा इतका जड होता की त्याला खेचण्यासाठी खूप ताकद लावूनही तो वर येत नव्हता, गळाला काहीतरी मोठं लागलं आहे या आनंदात तो व्यक्ती ते खेचत होतो, तेवढ्यात मगर पाण्यातून वर येते. त्यामुळे गळाला कोणता मासा अडकला नव्हता तर चक्क मगर अडकली होती हे लक्षात येतं.

या मगरीला पाहून हा व्यक्ती ते गळ तसंच पाण्यात टाकतो आणि मागे फरतो. ती मगरही आक्रमक झालेली दिसत होती. हा व्यक्ती मगरीच्या तावडीतून थोडक्यात बचावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: मित्र बनले शत्रु! तरुणाला बंद खोलीत सिंहिणीसोबत सोडलं, काही वेळातच तरुणाची भीषण अवस्था

या धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आले आहेत.