असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात, जे पाहून आपल्या भावनांना आवर घालणं अवघड होतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका फ्लाईटमधला हा व्हिडीओ आहे. यामध्ये एक फ्लाईट अटेंडंट तब्बल ३० वर्षांनी आपल्या आवडत्या शिक्षकाला भेटली. तेही ज्या फ्लाईटमध्ये ती ड्युटीवर होती, त्याच फ्लाईट ही भेट घडली. या व्हिडीओमध्ये एक फ्लाईट अटेंडंट तिच्या शिक्षिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहे.
गुडन्यूज_मूव्हमेंट नावाच्या इन्स्टाग्राम पेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जागतिक शिक्षक दिनी फ्लाईट अटेंडंट लॉरा रेनने तिची आवडती शिक्षिका मिस ओकॉनेल यांची भेट घेतली. ३० वर्षांच्या शिक्षिकेला पाहून लॉरा भावूक झाली. लॉराने तिच्या भावना विमानात बसलेल्या प्रवाशांसोबत शेअर करताना भावूक भाषण केले.
लॉराने शिक्षिकेला सांगितले की, तूम्ही माझं आयुष्य घडवलं. आज शिक्षक दिन आहे त्यामुळे आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात आवडत्या शिक्षकांना ओळखले पाहिजे. मी आता भावूक होत आहे, पण आज मला माझ्या १९९० च्या शिक्षिका मिस ओकॉनेल दिसत आहेत, ज्या विमानात आहेत.” हे ऐकताच विमानातील प्रवाशांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
लॉरा म्हणाली की, या माझ्या आवडत्या शिक्षिका आहे आणि मी त्यांना १९९० पासून पाहिलेले नाही. त्यांनी मला शेक्सपियरवर प्रेम करायला शिकवलं, पियानो वाजवायला शिकवलं. माझ्याकडे पियानोचे मास्टर होते आणि मी त्यांच्यावर निबंध लिहू शकते. धन्यवाद मिस ओकॉनेल. मी तुमच्यावर प्रेम करते.” त्यानंतर लॉरी तिच्या शिक्षिकेकडे जाते आणि त्यांना मिठी मारते. हे सगळं दृश्य भावूक करणारं होतं.
आणखी वाचा : यापैकी एक अंड थोडं वेगळं आहे! यामागचं कारण जाणून घेण्यासाठी पाहा VIRAL VIDEO
आणखी वाचा : फणा काढून उभा असलेल्या किंग कोब्राच्या माथ्यावर केलं कीस; VIRAL VIDEO पाहून अंगावर काटा येईल
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका शिक्षिकेने लिहिले की, व्हिडीओ पाहून मला रडू येत आहे. मी शिक्षक आहे. मला आशा आहे की माझे विद्यार्थी परत येतील आणि मला नमस्कार करतील. दुसर्या यूजरने लिहिले, “माझ्या हायस्कूलमधील कला शिक्षकांशी १० वर्षांनंतर पुन्हा संपर्क साधण्यात मी भाग्यवान ठरलो आणि आम्ही ईमेलद्वारे भेटलो.