चार धामपैकी एक असलेल्या बाबा केदारनाथच्या दर्शनाला जाण्याची अनेकांची इच्छा असते. पण देव दर्शनाला जाण्यासाठी कोणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तिकीटची मागणी केल्याचं तुमच्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आलं नसेल, पण सध्या अशी एक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्याकडे हेलिकॉप्टरच्या तिकीटची मागणी केली आहे. मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सार्वजनिक तक्रार सुनावणी सुरु असताना चक्क जिल्हाधिकाऱ्याकडे केदारनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टरचे तिकीट मिळावे, अशी अनोखी मागणी केली. शेतकऱ्याची मागणी ऐकून जिल्हाधिकारीही आश्चर्यचकीत झाले. मात्र, नंतर केदारनाथ येथील जिल्हाधिकाऱ्याशी बोलून तुम्हाला तिकीट मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्याला दिलं आहे.

हेही वाचा- “आईची माया…” मुलगा मिटींगमध्ये बिझी, काळजीपोटी आईने केला मेसेज; WhatsApp चॅटींगचा स्क्रीनशॉट पाहून नेटकरी भावूक

शेतकऱ्याची फसवणूक –

मिळालेल्या माहितीनुसार, रतलाम जिल्ह्यातील मथुरी गावातील रहिवासी समर्थ पाटीदार यांनी केदारनाथ दर्शनासाठी हेलिकॉप्टरचे तिकीट बुक केले होते पण त्यांची फसवणुक झाली होती. याबाबतची माहिती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. शेकऱ्याने सांगितलं की, मागील वर्षी आपण उत्तराखंडमधील फाटा हेलिपॅडवरून केदारनाथ यात्रेसाठी स्वत:चे आणि पत्नीचे ऑनलाइन तिकीट बुक केले होते. त्यासाठी ९ हजार रुपयेदेखील दिले होते. परंतु आमची बँकिंग फसवणूक झाली. तक्रारीनंतर सायबर सेलने बँकेतील घोटाळेबाजाचे खाते गोठवले, मात्र अद्याप पैसे परत मिळाले नाहीत. त्यानंतर तिकीटसाठी पुन्हा प्रयत्न केला, पण अर्ध्या तासात सर्व तिकीट विकल्याचे सांगून सेवा बंद करण्यात आली होती.

हेही पाहा- आयुष्यभर कष्ट केलं अन् म्हातारपणी पालटलं नशीब; रिक्षा चालक रात्रीत बनला करोडपती

जिल्हाधिकाऱ्यांनी ज्येष्ठांकडून पैसे घेऊन तिकीट द्यावे –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्याने विनंती केली की, ज्या वृद्धांना केदारनाथला जायचे आहे, परंतु त्यांना चालणे किंवा खेचरावर बसणे शक्य नाही, अशा वृद्धांकडून पैसे घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची तिकिटे उपलब्ध करून द्यावीत जेणेकरून वृद्ध लोकांनाही देवदर्शनासाठी जाता येईल. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याकडे अनोखी आणि महत्वपुर्ण मागणी करणाऱ्या शेlकऱ्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.