MP Former CM Shivraj Singh Chouhan Crying: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी भाजपने सोमवारी नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव घोषित केले आहे. उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन यादव हे मध्य प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री असतील. आमदार यादव हे चार वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलेल्या शिवराज सिंह चौहान यांची जागा घेतील. मोहन यादव यांनी शिवराज चौहान यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा भूषवले होते. मध्यप्रदेशमधील सत्तेची सूत्र यादव यांच्या हाती जाताच आता शिवराज सिंह चौहान यांचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. यामध्ये शिवराज सिंह चौहान हे रडताना दिसत आहेत. मुख्यमंत्रीपद गमावल्याच्या दुःखात चौहान यांना अश्रू आवरता आले नाहीत असा दावा या व्हिडीओसह करण्यात आला आहे.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Amock ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

Bhaskar Jadhav On MNS Raj Thackeray
‘मनसेने महायुतीला पाठिंबा दिला की द्यायला लावला?’, भास्कर जाधव यांचा सवाल
birendra singh
सर्व दहा जागा राखण्याचे हरियाणात भाजपपुढे आव्हान
Vikas Mahant came in costume of Narendra Modi in meeting of Thane Lok Sabha Constituency
ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अवतरले पण, ते खरे नसल्याचे कळताच…
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?

इतर युजर्सही व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हिडिओचे बारकाईने निरीक्षण करून आम्ही आमचा तपास सुरू केला. व्हिडिओवर ‘न्यूज तक’ लोगो होता. त्यानंतर आम्ही कीवर्ड शोधण्यास सुरुवात केली, परंतु आम्हाला समान व्हिडिओ सापडला नाही. मग तो मध्य प्रदेशातील व्हिडिओ असल्याने आम्ही हिंदीमध्ये कीवर्ड शोधण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर आम्ही हिंदी मध्ये युट्युबवर किवर्ड सर्च केला, ‘शिवराज सिंह चौहान रोने लगे News Tak’. यावरून आम्हाला मूळ व्हिडिओ सापडला.

हा १ मिनिट ३० सेकंदांचा व्हिडिओ होता. दत्तक कन्या भारती यांचे निधन झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांना अश्रू अनावर झाले, असे या बातमीत नमूद करण्यात आले आहे. हा व्हिडिओ चार वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात ही घटना घडल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.

आम्हाला या घटनेबाबत काही बातम्या देखील मिळाल्या.

https://www.indiatoday.in/india/story/shivraj-singh-chouhan-adopted-daughter-bharti-verma-dies-in-vidisha-1571136-2019-07-19

यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, भारती ही शिवराज सिंह चौहान यांच्या सेवाश्रमाची माजी रहिवासी होती. मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी भारतीला आपल्या मुलीसारखे वागवले आणि गेल्या वर्षी तिचा विवाह सोहळा संपन्न झाला होता.

https://www.ndtv.com/india-news/shivraj-chouhans-adopted-daughter-bharti-verma-dies-in-madhya-pradesh-2071836

या बातम्या जुलै २०१९ मधील होत्या.

हे ही वाचा<< राहुल गांधींनी कमळ हातात घेतलं अन्.. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर चिखलातील फोटो चर्चेत, पण..

निष्कर्ष: शिवराज सिंह चौहान रडताना दिसत असलेला व्हायरल व्हिडिओ जुलै २०१९ चा आहे जेव्हा शिवराज सिंह यांची दत्तक मुलगी भारती वर्मा हिचे मध्य प्रदेशात निधन झाले होते. हा व्हिडिओ अलीकडील असल्याचा सांगून व्हायरल होत आहे.