Artificial Intelligence: तुम्ही कधी विचार केला आहे की, जर महात्मा गांधी यांच्या काळात मोबाईल कॅमेरा असता तर त्यांनी सेल्फी कसा काढला असता किंवा त्यांचा फोटो कसा दिसला असता? तुम्ही कदाचित अशी कल्पना कधीही केली नसेल पण एका कलाकाराने हीच कल्पना सत्यामध्ये उतरवली आहे. तुम्ही AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबदद्ल ऐकलं असेलच. त्याच AI तंत्रज्ञानाने ही कमाल करुन दाखवली आहे.

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा सुरु आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने सध्या अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहे. जवळजवळ प्रत्येकजण AI टुल्स आणि त्याचे फायदे आणि तोटे यावर चर्चा करत आहे. शिवाय, AI द्वारे तयार केलेले फोटो सतत सोशल मीडियावर चर्चेत असतात.

AIच्या तंत्रज्ञानाची कमाल! पाहा भुतकाळातील दिग्गजांचे सेल्फी

तुम्ही सोशल मीडियावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तयार केलेले अनेक फोटो पाहिले असतील जे तुम्हाला भूतकाळात आणि भविष्यकाळात घेऊन जातात. असेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चमध्ये आहे ज्यामध्ये गांधीजींपासून ते आंबेडकरांपर्यंत अनेक दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. आता भूतकाळातील दिग्गजांच्या सेल्फीची सर्वत्र चर्चा होत आहे.

AIच्या मदतीने आर्टिस्टने केली कमाल

तर, स्वत:ला आर्टिफिशियल इंटेलिजन्स उत्साही असे म्हणणाऱ्या ‘ज्यो जॉन मुल्लूर’ नावाच्या कलाकाराने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने काही फोटो तयार केले आहेत ज्यामध्ये या दिग्गजांनी सेल्फी घेतला असता तर तो कसा दिसला असता याची कल्पना करण्यात आली आहे.

VIDEO: ९०,००० रुपयांची नाणी घेऊन टु व्हिलर खरेदी करण्यासाठी निघाला पठ्ठ्या, पुढे काय झालं जाणून घ्या

‘महात्मा गांधी, मदर टेरेसा या दिग्गजांचे सेल्फी पाहा

या कलाकाराने इंस्टाग्रामवर AIने तयार केलेले भूतकाळातील दिग्गजांचे अनेक सेल्फी शेअर केले. बरं, या यादीत महात्मा गांधी, मदर तेरेसा, अब्राहम लिंकन, एल्विस प्रेस्ली आणि अल्बर्ट आइनस्टाईन यांचा समावेश आहे. तसेच यात मर्लिन मनरो, बॉब मार्ले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील दिसत आहेत.

“माझा जुना हार्ड ड्राइव्ह पुन्हा मिळाल्यावर, मला भुतकाळातील मित्रांनी पाठवलेल्या सेल्फीचा खजिना सापडला,” असे कॅप्शन त्याने इंस्टाग्राम पोस्टला दिले आहे. या पोस्टने साहजिकच अनेकांचे लक्ष वेधले आणि इंस्टाग्राम वापरकर्ते या कलाकाराची प्रशंसा करणे थांबवू शकले नाहीत.

हनी सिंगच्या गाण्यावर नव्हे, तर हनुमान चालिसामध्ये तरुणाई गुंग; भक्तीमय व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

“नेहमीप्रमाणेच अप्रतिम. ते सर्व सुंदर आहेत,” असे कमेंटमध्ये एका वापरकर्त्याने लिहिले आहे.

दुसर्‍या वापरकर्त्याने, “अप्रतिम” अशी कमेंट केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला हे AI फोटो कसे वाटले? खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा.