Ganesh chaturthi dance: सोशल मीडिया रोज वेगवेगळा ट्रेंड असतो.आज गणेशचतुर्थी घरोघरी बाप्पाच्या बाप्पांचं आगमन झालं आहे. आजपासून पुढील दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सव महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्री गणेशाला बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानले जाते. अशातच काही महिलांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय यामध्ये त्यांना गणपती बाप्पााच्या आगमनाला सुंदर नृत्य केलंय.

सोशल मीडियावर कायम अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुलांचे शाळेतील डान्स तर कोणाचा लग्नाच्या वरातीमधील डान्स. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या सोशल मीडियावर मराठमोळ्या महिलांच्या एका ग्रुपचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. दरम्यान अशाच काही हौशी महिलांचा गृप डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला महिलांचा एक ग्रुप दिसेल.५ महिलांना सारख्याच साड्या नेसल्या आहेत, या महिला खूप सुंदर दिसताहेत. या महिला अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग, जसा गणपती चा गोंडा चौरंगी लाल बावटा ग या मराठी गाण्यावर बाप्पााच्या स्वागताला डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. एवढचं नाहीतर या महिलांनी या गाण्यातील एकदम सेम टू सेम स्टेप्स केल्या आहेत. संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर creation_dance_studio या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूपच भारी सगळ्या अगदी मस्त करत आहात” तर एका युजरने लिहिलेय, “किती छान, गाणे..ग्रुप..डान्स… एकी आहे. जबरदस्त महाराष्ट्रीयन संस्कृती जपून एवढे सुंदर नृत्य करत आहेत. आणखी एका युजरने लिहिलेय, “संसाराची जबाबदारी सांभाळून महिला असा आनंद जेव्हा लुटतात तेव्हा त्या अशा अनेक महिलांचं स्वप्न जगत असतात”