भारतीय क्रिकेट संघातील सर्वात यशस्वी सलामीवीरांपैकी एक असलेल्या गौतम गंभीरने (gautam Gambhir) क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणातील करिअर सुरु केले. मात्र असे असतानाही त्यांचे क्रिकेटवरील (cricket) प्रेम कमी झाले नाही आणि तो अजूनही क्रिकेटशी जोडलेला आहे. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2022) कॉमेंट्री किंवा फ्रेंचायझीचा मार्गदर्शक म्हणून काम करताना दिसला. कार्यरत खासदार असूनही, गंभीरला त्याच्या आयपीएल आणि कॉमेंट्रीबद्दल विचारले असता त्याने समर्पक उत्तर दिले.

गौतम गंभीर हे पूर्व दिल्ली मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. राजकारणी म्हणून, माजी भारतीय क्रिकेटपटूने गांधी नगरमध्ये ‘जन रसोई’ नावाचे स्वयंपाकघर उघडले आहे, जे लोकांना एक रुपयात जेवण देते. त्यांनी परिसरात वाचनालयही बांधले आहे. भाजपच्या आठ वर्षांच्या सत्तेबद्दल एका मीडिया कॉन्फरन्स दरम्यान, गंभीरला त्याच्या आयपीएल फ्रँचायझी आणि कॉमेंट्री करण्याच्या भूमिकांबद्दल विचारले गेले. क्रिकेटपटूतून राजकारणी झालेल्या गंभीरने सांगितले की, गरीबांसाठी करत असलेले कल्याणकारी कार्य सुरू ठेवण्यासाठी त्यांना तेथे काम करावे लागेल.

Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार
ajit pawar group on suresh dhas
Suraj Chavan: “..तेव्हा गृहखातं झोपा काढत होतं काय?”, सुरेश धसांच्या विधानानंतर अजित पवार गटाच्या नेत्याची टीका
badlapur employee Registrar Cooperative Societies Office bribery case
लाचखोर सहाय्यक निबंधक आणि सहकारी अटकेत, गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी घेतली ६० हजारांची लाच
Suresh Dhas
Suresh Dhas : “पहिली पसंती मुख्यमंत्र्यांना, अजित पवार झाले तर…”, बीडच्या पालकमंत्री पदाबाबत सुरेश धस यांचं स्पष्ट मत
nashik ang robbed an onion trader in bus parked at the Mela bus station
बनावट कागदपत्रांद्वारे ४९६ कोटींची कर चुकवेगिरी,जीएसटी कार्यालयाकडून तक्रार; दोघांविरुद्ध गुन्हा

(हे ही वाचा: मुलीने हार घालण्यास नकार दिल्याने वराला आला राग आणि… ; बघा Viral Video)

गौतम गंभीर म्हणाला, “मी कॉमेंट्री का करतो किंवा आयपीएलमध्ये काम का करतो कारण मी दरमहा ५००० लोकांना जेवण देण्यासाठी २५ लाख रुपये खर्च करतो. म्हणजे दरवर्षी सुमारे २.७५ कोटी रुपये असेल. वाचनालय बांधण्यासाठी मी २५ लाख रुपये खर्च केले आहेत. हे सर्व पैसे मी एमपीएलएडी फंडातून नाही तर माझ्या खिशातून खर्च करतो. एमपीएलएडी फंडातून हे स्वयंपाकघर किंवा इतर कोणतेही काम चालत नाही. माझ्या घरात असं एकही झाड नाही ज्यातून मी पैसे काढू शकेन.”

(हे ही वाचा: Video: टाकाऊ वस्तूंपासून पासून बनवलेली टिकाऊ जीप पाहिलीत का?)

(हे ही वाचा: Viral: व्यक्ती गाढ झोपेत असताना अंगावर चढले दोन मोठे अजगर; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले थक्क)

तो पुढे म्हणाला, “मी फक्त या साठी काम करतो काम करतो की मी त्या ५००० लोकांना अन्न पुरवू शकतो किंवा ती लायब्ररी उभारू शकतो. मी आयपीएलमध्ये कॉमेंट्री करतो आणि काम करतो हे सांगायला मला लाज वाटत नाही. मी जे काही करतो हेच अंतिम ध्येय आहे.”

Story img Loader