राज्यात सध्या नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव चांगलंच गाजत आहे. लहानापासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वचजण तिच्या अदांवर भाळलेले दिसून येत आहेत. सोशल मीडियावरसुद्धा सतत गौतमी पाटीलच्या नावाचा जलवा पाहायला मिळत असतो.आपल्या डान्स आणि अदांमुळे नेहमीच गौतमी पाटील सध्या यशाच्या शिखरावर आहे. मात्र, एकदोन दिवसात तिच्या कार्यक्रमाची बातमी झाली नाही असं होत नाही. काही ना काही कारणांमुळे गौतमीचा कार्यक्रम चर्चेत येत असतो. दरम्यान गौतमी पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, गौतमीचा एक नवा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय झालाय. गौतमी एका कार्यक्रमात स्टेजवरच तिच्या चाहत्याला किस करतेय. गौतमीचा हा किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

एकाला किस तर काहींना फटके

गौतमी पाटील सबसे कातील, गौतमी पाटील…असं म्हणत आपल्या अदाकारीनं महाराष्ट्रातल्या तरूणाईला घायाळ करणारी गौमतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. गौतमची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणतीही रिस्क घ्यायला तयार होतात. गौतमीचा डान्स पाहण्यासाठी चाहते कधी झाडावर चढतात तर कधी छतावर. दरम्यान आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गौतमी तिच्या चाहत्याला चक्क किस करते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा चाहता तिचा डान्स सुरु असताना स्टेजवर येतो आणि गौतमीसोबत डान्स करतो. नंतर गौतमीच्या गालावर किस करायला जातो तर गौतमी बाजूला होते. या दरम्यान गौतमीच त्याला जवळ ओढते आणि गालावर किस करते. गौतमीचा हा चाहता फार मोठा नाहीय तर, एक लहान मुलगा आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: कुत्र्याला वाचवण्याच्या नादात मृत्यृच्या दारात पोहचला, शेवटी गोठावणाऱ्या बर्फात दोघेही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौतमी पाटीलला या काही महिन्यांमध्ये अफाट लोकप्रियता मिळाली आहे. गावोगावी लोक तिला मोठी रक्कम देऊन कार्यक्रमासाठी बोलावत आहेत. तिच्या कार्यक्रमांना गर्दी बघण्यासारखी असते. एकीकडे असं असलं तर दुसरीकडे मात्र गौतमी पाटीलला कॉंट्रोव्हर्सी क्वीनसुद्धा म्हटलं जाऊ लागलं आहे. कारण गौतमीचा कोणताही कार्यक्रम वादविवादांशिवाय आणि विचित्र प्रकारांशिवाय पार पडतच नाही.