Viral Lavani Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ दरदिवशी व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ अगदी सुंदर असतात तर काही इतके आक्षेपार्ह्य असतात की ज्यामुळे वादाला तोंड फुटतं. असाच एक नवीन वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे . यामध्ये गौतमी पाटील ही तरुणी बेभान होऊन नाचताना दिसत आहे. तिच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये ती लावणीच्या गाण्यांवर जरी थिरकताना दिसत असली तरी एकूणच सादरीकरणातील हावभाव पाहता त्या थिरकण्याला लावणी म्हणणे उचित ठरणार नाही. यावरून अनेक लोककला संवर्धक संघांनी तिला भेटून समज दिली आहे तर अनेक मराठी रोस्ट करणाऱ्या युट्युबर्सनी सुद्धा तिची चांगलीच शाळा घेतली आहे. हे नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात..

गौतमी पाटीलच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?

गौतमी पाटीलचा व्हिडीओ पाहता तो सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावे आयोजित केलेला असावा हे दिसतेय. व्हायरल व्हिडिओमध्ये अगदी विचित्र हावभाव करून, अंगावर पाणी ओतून गौतमी नाचताना दिसत आहे.

गौतमी पाटीलच्या व्हिडिओचा वाद काय?

हा व्हिडीओ वादातीत असला तरी तो तुफान व्हायरल होत आहे हे ही तितकंच खरं. मुख्य म्हणजे या व्हिडीओला शेकडो टीका केलेल्या असल्या तरी हजारो प्रेक्षक या व्हिडिओमध्ये गौतमीसह नाचतनाही दिसत आहेत. यामुळे फक्त नाचणाऱ्या गौतमीला टार्गेट केलं जावं की प्रेक्षकांनाही दोषी धरावं असा वाद ऑनलाईन दिसत आहेत.

मेघा घाडगे यांनीही घेतली भेट

महाराष्ट्राची समृद्ध लावणीकला अशा प्रकारे सादर करण्यावरून मेघा घाडगे यांनीही गौतमीची भेट घेऊन तिची कानउघाडणी केली आहे. लावणीचे नाव अगोदरच वादात असताना अशा शुल्लक प्रसिद्धीसाठी केलेल्या विभत्स नृत्यावरून गौतमीची शाळा घेतली गेली. यानंतर गौतमी पाटील हिने माफी मागणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. मात्र काही तासांनी हा व्हिडीओसुद्धा डिलीट करण्यात आला होता.

गौतमी पाटील डान्स

गौतमी पाटील चंद्रा लावणी

View this post on Instagram

A post shared by ❤️ (@gautamipatil_7272)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मराठी युट्युबर्सनी सुद्धा गौतमीच्या व्हिडिओवरून नाराजी व्यक्त केली आहे. हल्ली सोशल मीडियाच्या बायोमध्ये डान्सर, आर्टिस्ट टाकून कोणीही स्वतःला लावणी सम्राज्ञी म्हणायला लागले आहे. मात्र विठाबाई नारायणगावकर, मंगला बनसोडे, शाहीर पठ्ठे बापूराव, सुरेखा पुणेकर यांसारख्या कलाकारांनी जपलेली कला धुळीत मिळवण्याचं काम हे नकली कलाकार करत आहेत अशी भावना सर्वच युट्युबर्सनी व्यक्त केली आहे.