German TikToker Noel Robinson detained in bengaluru Video : प्रसिद्ध जर्मन टिकटॉक स्टार नोएल रॉबिन्सन हा अनेक दिवसांपासून भारतातील रस्त्यांवर स्ट्रीट डान्स करण्यासाठी चर्चेत राहिला आहे. पण याच स्ट्रीट डान्समुळे तो अडचणीत देखईल सापडला आहे. तो दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डान्स व्हिडीओ रेकॉर्ड करतो. यावेळी त्याच्या भोवती मोठ्या संख्येने लोक देखील गोळा होतात. बंगळुरूमध्ये असेच रस्त्यावर डान्स करताना मोठ्या संख्येने लोकांची गर्दी जमा झाली, ज्यामुळे वाहतुकीत अडथळा होऊ ळागला, यानंतर पोलिस नोएल रॉबिन्सन आणि त्याचा साथिदार यूनुस जारू याला पोसीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि सुमारे १५ मिनीटं तिथे त्याला ठेवण्यात आले.
रॉबिन्सन याच्यावर आरोप काय आहे?
नोएल रॉबिन्सन बंगळुरू येथील चर्च स्ट्रीटवर डान्सचा व्हिडीओ शूट करत होता. यादरम्यान तेथे मोठ्या संख्यने गर्दी जमा झाली. यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं की तो परवानगीविना शूटिंग करत असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. एका व्हिडीओमध्ये रॉबिन्सनने पोलिसांनी सांगितले की त्याच्याकडून २ डॉलर्सचा दंड वसूल करण्यात आला.
कोन आहे नोएल रॉबिन्सन?
नोएल रॉबिन्सनचा जन्म २००१ मध्ये झाला, तो एक जर्मन टिकटॉक स्टार, कंटेंट रायटर आणि डान्सर आहे. त्याचे कुटुंब मुळचे नायजेरीया येथील आहे. नोएलला त्याची जर्मन आई एंड्रियाने वाढवलं आहे. त्याची आई ही एक चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर आहे. डान्सबरोबरच नोएल याची हेअरस्टाईल देखील विशेष प्रसिद्ध आहे.
इन्स्टावर फॉलोअर्स किती आहेत?
जर्मन टिकटॉकप नोएल रॉबिन्सन याचे इन्स्टाग्रामवर ११.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर त्याने त्याच्या अकाउंटवर ७३९ पोस्ट केल्या आहेत. याखेरीच त्याचे टिकटॉकवर ४४ मिलियन फॉलोअर्स आहेत.
पोलिसांनी सोडून दिल्यानंतर नोएलने एक व्हिडीओ पोस्ट केला ज्यामध्ये त्यांना पोलीस कारमध्ये बसवत असल्याचे दिसत आहे. नोएलने सांगितले की पहिल्यांदाच त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस तुरुंगात तर पाठवणार नाहीत ना याची मला भीती वाटत होती. पण सर्वकाही व्यवस्थित झालं. मी सुरक्षित आहे आणि माझे भारतावर प्रेम आहे. तसेच तो म्हणाला की असे कोणत्याही देशात होऊ शकते.