सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे पाहिल्यानंतर आपणाला संताप येतो. सध्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील असाच एक किळसवाणा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या तरुणावर जेवणात थुंकल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा तरुण जेवणात थुंकतानाचा व्हिडीओ कोणीतरी लपून शूट केला होता. जो सध्या व्हायरल होत आहे.
पोलिसांनी नोंदवला गुन्हा –
मिळालेल्या माहितीनुसार हा व्हायरल व्हिडिओ गाझियाबादच्या लोनी भागातील सलाम चिकन रेस्टॉरंटमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. रेस्टॉरंटचे कर्मचारी जेवणात थुंकत असल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सलाम कुरैशी आणि अय्यूब कुरैशी अशी जेवणाच्या पाकिटांवर थुंकल्याचा आरोप करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
नरेंद्र गुप्ता नावाच्या युजरने लिहिले की, “यासारख्या वाईट स्वभावाच्या लोकांना तुरुंगात टाकायला हवं कारण ते मानसिक विकृतीचे आहेत.” दीपिका नावाच्या युजरने, “बाहेरचे जेवणही बंद केले पाहिजे. हे सापडले मात्र असे किती लोक असतील जे दिसत नाहीत? आणखी एका यूजरने लिहिले, “हे लोक असे का करतात? त्यांना पकडले जाण्याची भीती वाटत नाही का?” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये खाण्यापेक्षा घरी खाणे चांगले.