आपल्या आसपास अनेक विचित्र प्रकारची माणसं राहतात, जे कधी विनाकारण सरकारी मालमत्तेचं नुकसान करतात, तर कधी सरकारी वस्तूंची चोरी करतात. शिवाय असे लोक रेल्वेतून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात आढळतात. रेल्वेतून प्रवास करताना एसी कोचमध्ये बेडशीट, उशा आणि रुमाल अशा काही वस्तू दिल्या जातात. जे काही लोक आपल्या बॅगमध्ये घालून घेऊन जातात. या लोकांच्या चोरीच्या कृत्यांमुळे रेल्वेचा चांगलाच तोटा होता. शिवाय कर्मचाऱ्यांना अशा चोरांचा खूप त्रास सहन करावा लागतो.

सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका कुटुंबाने रेल्वे डब्यातून खाली उतरताना रेल्वेने दिलेली चादर आपल्या बॅगेत घातल्याचं दिसत आहे. शिवाय कोच अटेंडंटने त्यांला पकडताच तो वेगवेगळी कारणं देताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रेल्वे कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसत आहे. कर्मचारी सतत आरपीएफला फोन करून बॅग तपासण्याची मागणी करत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, प्रवासी त्याची बॅग उघडायला सुरुवात करतो तशी त्याच्या बॅगेतून रेल्वेतील चादर दिसते. शिवाय कर्मचारी या बॅगमध्ये ३ चादर असल्याचं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. या संपूर्ण भांडणाचा व्हिडिओ कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये शूट केला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे.

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
Double MA and PhD Lady Selling tea on road
MA, Ph.D ची डिग्री असूनही विकतेय रस्त्यावर चहा, महिलेनी सांगितले कारण, VIDEO Viral
Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा- गौतमी पाटीलला धमकी देणाऱ्यांसाठी मराठा सेवा संघाचे मोठे विधान; म्हणाले, “मराठा समाजाच्या मुलांनी तिच्या…”

हेही पाहा- “पगावारढीच्या स्वप्नांवर…” कर्मचाऱ्याने ऑफिसला उशिरा येण्याचं अनोखं कारण सांगितलं, बॉसनेही भन्नाट प्रत्युत्तर दिलं; स्क्रीनशॉट Viral

या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी भारतात काहीही होऊ शकतं, आता चादरांनाही लॉक लावावी लागणार, असं म्हटलं आहे. तर तर आणखी एकाने, “चोरी करणे हा गुन्हा आहे, दोषींना शिक्षा दिलीच पाहिजे.” अशी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने खूप मजेशीर कमेंट केली आहे, त्याने लिहिलं आहे” ही त्याची चूक नाही, बॅग तळाशी उघडी ठेवली होती. ट्रेन धक्के देत हळू चालत होती, चादर आपोआप घसरली आणि त्याच्या बॅगेत आली.”आणखी एकाने “रेल्वेचे लोक किती क्रूर आहेत, एक व्यक्ती चादरही घेऊ शकत नाही का?” अशी कमेंट केली आहे.