Shocking video सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हे व्हायरल व्हिडिओज नेहमीच लोकांना थक्क करत असतात, कारण यात बऱ्याचदा असे काही दृश्ये दिसून येते जे सहसा लोकांनी कधी पाहिलेले नसते. इथे कधी काही विचित्र घटना व्हायरल होतात तर कधी जीवघेणे अपघात तर कधी इथे थरारक स्टंट्स देखील व्हायरल होत असतात बहुतांश लोक हल्ली वेकेशनवर आहेत किंवा त्याचा प्लान आखत आहेत. लोकांना नवीन ठिकाणी फिरायला जायला. तिथे गेल्यावर काही साहसी एक्टिविटी करायला फार आवडते.लोक पॅराग्लायडिंग, पॅरासिलिंग, अंडरवॉटर, डायविंग, सी एक्टिविटीज, रोप वे, बंजी जंपिग सारख्या साहसी एक्टिविटी करताात. तसं पाहाता या एक्टिविटीज सगळ्या सेफ्टि प्रिकॉशन घेऊन केल्या जातात. पण असं असलं तरी देखील कधी कधी असे काही घटना घडतात ज्या खूपच धक्कादायक असतात. ज्यामुळे कधी कोणाला प्राण गमवावे लागत आहे, तर कधी लोक गंभीर जखमी होत आहेत.

लोक आपल्या आनंदासाठी अनेक नवनवीन प्रकल्प करू पाहतात मात्र प्रत्येक वेळी हे आपल्याला आनंद देईलच असे नाही कधी कधी ही मजा आपल्या जीवावर देखील बेतू शकते. सध्या असाच काहीसा प्रकार व्हायरल व्हिडिओत दिसून आला समुद्राच्या वर अवकाशात हवेच्या झोरावर उडण्याचा अनोखा आनंद अनेकांना सुखकर अनुभव देऊन जातो. मात्र हा खेळताना सावधानतेचा भान ठेवणे गरजेचे आहे. या खेळात जीवाचा धोका फार असतो ज्यामुळे हे आपल्या जीवावर देखीकी बेतू शकते. सध्या अशाच एक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात सहासी एक्टिविटी करताना घडून आलेल्या एका दुर्घटनेचे भीषण दृश्य दिसून आले . हा व्हिडिओ थक्क करून सोडेल.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही जर निट पाहिले तर यात दिसते की, एक तरुणी अवकाशात झेप घेत आहे. उंचावरुन हवेत उडी मारताना तिनं सेफ्टी जॅके घातल्याचं दिसत आहे. मात्र तितक्यात नको ते घडते आणि हा खेळ एक वेगळेच वळण घेतो. पुढे तुम्ही पाहू शकता की, यात अवकाशात झेपावलेल्या तरुणीच्या पॅराशूटची दोरी अचानक तुटते आणि तिचा तोल जातो आणि ती जोरदार वेगाने खाली पडते. हा संपूर्ण थरार व्हिडिओमध्ये एक वेगळेच वळण घेतो. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DJGjFCWv6O_/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला साहसी खेळ आवडत नाहीत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वडील नेहमी सांगतात की, असे काम कधीही करू नये, ज्यात एका चुकीची शिक्षा थेट मृत्यूच मिळते”