होळीच्या दिवशी गोंधळ घालणाऱ्या लोकांचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल. अवघ्या १४ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी चालत्या स्कूटरवर उभी असताना होळी खेळताना दिसत आहे, पण पुढच्याच क्षणात तिच्याबरोबर जे घडते, ते कदाचित ती आयुष्यभर विसरणार नाही. संपूर्ण व्हिडीओ येथे पाहा.
चालत्या स्कूटरवर होळी (होळी स्टंट व्हिडिओ)
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील नोएडा येथील असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती स्कूटर चालवताना दिसत आहे, तर एक मुलगी त्याच्या मागे सीटवर उभी राहून रील बनवताना दिसत आहे. चालत्या स्कूटरवर मुलगी कशी होळी खेळत आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये, मुलगी स्कूटीवर उभी राहून स्कुटी चालवणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर रंग लावताना दिसत आहे, परंतु पुढच्याच क्षणी तो मुलगा कार समोर आल्यामुळे अचानक ब्रेक मारतो आणि ती मुलगी रस्त्यावर जोरात आपटते.
हेही वाचा – चालत्या स्कुटीवर तरुणींचा अश्लील डान्स! व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी, पोलिसांनी अशी घडवली अद्दल की….
व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.एकाने लिहिले की, “त्याने तिला मुद्दाम पाडले आहे. सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्याचा आणखी एक स्टंट!!” व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तरुणीची खिल्ली उडवली आहे.
येथे व्हिडिओ पहा
हेही वाचा – आयुष्यात फक्त असं प्रेम मिळाले पाहिजे! आजोबांना घास भरवणाऱ्या आजींचा व्हिडीओ बघाच
अशाप्रकारे काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे इतर प्रवाशांचा जीव धोक्यात टाकत आहे. नोएडा पोलिसांनी होळीच्या दिवशी स्टंटबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. मधुर सिंग नावाच्या युजरने त्याच्या एक्स हँडलवरून व्हिडिओ पोस्ट केला आणि नोएडा ट्रॅफिक पोलिसांना टॅग करून तक्रार दाखल केली.