Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे कधी हसवणारे असतात कधी रडवणारे तर, कधी थरारक असतात. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, महिलांना शॉपिंगची खूप आवड असते. मग ती विंडो शॉपिंग असो किंवा दारावर आलेला एखादा फेरीवाला महिला खरेदी करायला पहिल्या पुढे असतात. आता हाच व्हिडीओ पाहा ना, यामध्ये एक महिला १५० रुपयांची बादली घेत होती. पण बादलीची क्वालिटी चेक करण्यासाठी ती त्यावर उभी राहिली. आणि पुढे काय घडलं हे आता तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

एखादी वस्तू घेताना महिला किती भाव करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. तसेच ती वस्तू किती टिकाऊ आहे हे सुद्धा त्या पाहत असतात. जोपर्यंत ती वस्तू दिर्घकाळ टिकेल असं वाटत नाही तोपर्यंत महिला अनेक वेगवेगळे ऑप्शन पाहत असतात. थोडक्यात खरेदीमध्ये कुणीही महिलांचा हात धरु शकत नाही.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक फेरीवाला सायकवरून प्लास्टिकची भांडी विकत आहे. दरम्यान एक महिला त्याच्याकडून एक बादली खरेदी करतेय. फेरीवाल्यानं महिलेला १५० रुपयांची बादली दाखवली. पण महिलेल्या त्या बादलीच्या दर्जाबाबत संशय होता. मग काय बादलीची क्वालिटी चेक करण्यासाठी ती थेट त्यावर उभी राहिली. आणि मग काय तिच्या वजनानं बादलीच फुटली. शेवटी ती महिला बादलीसोबत खाली पडली. आणि उलट त्या फेरीवाल्यालाच बडबडू लागली. बिचारा फेरीवाला हे बघून टेंशनमध्ये आल्याचं दिसत आहे. एकतर बादली विकत नाही घेतली आणि दुसरं म्हणजे नुकसानही झालं. त्यामुळे फेरीवाल्याला चांगलाच फटका बसला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @jalimpatrakar नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “देवा काय करावं या बायकांचं?” तर दुसरा म्हणतो, “महागड्या किमती असूनही, उत्पादनाची गुणवत्ता आवश्यक मानकांची पूर्तता करु शकली नाही.” तर आणखी काहींनी “पुरुष महिलांसमोर उभे राहू शकत नाहीत, ही तर बादली आहे, “कधीकधी स्वस्त वस्तू खरोखर महागात पडतात” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.