सहसा वर्गातील शिक्षक विद्यार्थ्यांवर रागावत असतात. ते त्यांना अनेकदा शिव्या देतात किंवा मारतात. मात्र, काही विद्यार्थी शिक्षकांशी गैरवर्तनही करतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्काच बसला आहे. कारण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी वर्गात प्रचंड गोंधळ घालताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर या मुलीने शिक्षिकेला जोरदार कानशिलात लगावली आणि शिवीगाळही केली. या मुलीचा प्रताप इथेच संपत नाही तर या मुलीने शिक्षिकेसमोरच टेबलवर फोन जोरात आपटला. नक्की काय आहे हे प्रकरण ? जाणून घेऊयात सविस्तर…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ टेक्सासमधला आहे. टेक्सासच्या एका शाळेत एका विद्यार्थीनीने रागाच्या भरात वर्गशिक्षिकेवर चिडत गैरवर्तन करताना दिसून येतेय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विद्यार्थिनी रागाच्या भरात तिच्या बेंचवरून तावातावाने उठते आणि तिच्या आईला बोलावण्यासाठी शिक्षिकांच्या डेस्कजवळ येते. त्याचवेळी शिक्षिकेने फोन करण्यास नकार दिल्याने तिने शिक्षिकेसोबतच हुज्जत घालायला सुरूवात केली. यात तिच्या अरेरावीची मजल इथपर्यंत पोहोचली की तिने चक्क शिक्षिकेच्या कानशिलातच लगावली. हे पाहून शिक्षिकेने तिला वर्गाबाहेर जाण्यासाठी सांगितलं. पण या मग्रूर विद्यार्थीनीने शिक्षिकेचं काहीही न ऐकता जागेवरच उभी राहिली आणि टेबलवरील फोनवरून तिच्या आईला लागोपाठ फोन करू लागली.

यानंतर या विद्यार्थीनीने शिक्षिकेला वांशिकतेवर शिवीगाळ केली. या विद्यार्थीनीचा गोंधळ इथेच संपला नाही तर तिने टेबलवर ठेवलेला फोन शिक्षिकेच्या दिशेने जोरात फेकून दिला आणि वर्गाबाहेर निघून गेली. यावेळी विद्यार्थीनीच्या या अनपेक्षित कृत्याने हैराण होत शिक्षिका इकडे तिकडे बघू लागते.

या व्हिडीओमधली गोंधळ घालणारी ही श्वेतवर्णीय मुलगी फोर्ट वर्थ येथील कॅसलबेरी हायस्कूलमधील वर्गात एका कृष्णवर्णीय महिला शिक्षिकेच्या हाताला मारताना दिसली आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : शाळेत वर्गाबाहेर मस्ती करत होता, मग पुढे जे झालं ते पाहून हसू आवरणार नाही

इथे पाहा संपूर्ण व्हिडीओ:

आणखी वाचा : आता परफेक्ट गोल आकारात डोसा बनवण्याची चिंता सोडा, रोटी मेकर पाठोपाठ आता डोसा मेकर; पाहा VIRAL VIDEO

हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत आणि आता तो वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. ट्विटरवर @chris_notcapn नावाच्या युजरने मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २.७ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर १३ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे आणि त्यावर तीव्र प्रतिक्रियाही येत आहेत.

या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शाळेकडून एक प्रतिक्रिया जाहीर करण्यात आलीय. “आम्ही आमच्या शिक्षकांवरील छळ, वंशवाद आणि हिंसा सहन करणार नाही…शिक्षिकेच्या सुरक्षेसाठी कडक कारवाई करण्यात येईल. शाळा या संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.” , असं या प्रतिक्रियेत सांगण्यात आलंय.