VIRAL VIDEO : शाळेत वर्गाबाहेर मस्ती करत होता, मग पुढे जे झालं ते पाहून हसू आवरणार नाही

शाळा-कॉलेजमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी असतात. काही अभ्यासू असतात तर काही विद्यार्थ्यांचं शालेय जीवन मस्ती आणि खोड्या काढण्यातच निघून जातं. सध्या अशाच एका मस्तीखोर मुलाचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. यात त्याच्यासोबत पुढे जे झालं ते पाहून पोट धरून हसाल.

student-fun-in-front-of-teacher-viral-video
(Photo: instagram/ bhutni_ke_memes)

Viral Video Today: सोशल मीडियाच्या गमतीशीर जगात रोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. शाळा-कॉलेजमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी असतात. काही अभ्यासू असतात तर काही विद्यार्थ्यांचं शालेय जीवन मस्ती आणि खोड्या काढण्यातच निघून जातं. सध्या अशाच एका मस्तीखोर मुलाचा शाळेत मस्ती करतानाचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतोय. मस्तीच्या धुंदीत असताना या मुलासोबत अचानक पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसूही आवरणार नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लाखो लोकांनी पाहिला गेला आहे आणि शेकडो लोकांनी त्याला लाइक केलं आहे.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की शाळेत मुलं खेळाखेळातच असं काही करून जातात ज्यामुळे त्यांना दुखापत होते. मात्र, मुलांना एखादी गोष्ट करण्यापासून कितीही अडवलं तरीही शेवटी ते स्वतःच्या मनाचंच करतात. सध्या अशाच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात आपली मस्ती या मुलाला चांगलीच महागात पडल्याचं दिसतं.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, शाळेत वर्ग सुरू आहेत, तेव्हाच वर्गाबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत हा मस्तीखोर विद्यार्थी मस्ती करताना दिसतोय. कधी तो मोकळ्या जागेत वेगाने धावत स्लाइडची मजा घेताना दिसून येतोय. पण मुलाची ही अनोखी मस्ती त्याला महागात पडते. मात्र अचानक त्याच्यासमोर शिक्षक येतात आणि त्याला मस्तीत खेळताना पाहून शिक्षकाने त्याच्या केसांना पकडून ओढलं आणि लागोपाठ फटके दिले. या व्हिडीओमधले हे दृश्य पाहून प्रत्येकजण पोट धरून हसू लागले आहेत.

आणखी वाचा : आता परफेक्ट गोल आकारात डोसा बनवण्याची चिंता सोडा, रोटी मेकर पाठोपाठ आता डोसा मेकर; पाहा VIRAL VIDEO

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कॉलेजमध्ये सॅक-बेड आणि गोधडी घेऊन आली ही विद्यार्थीनी; पाहून प्रत्येकजण हैराण

हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाला त्यांच्या शाळेतील लहानपणीचे दिवस आठवू लागले आहेत. हा व्हिडीओ ‘bhutni_ke_memes’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. तीन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. अवघ्या तीन दिवसांत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.

सोशल मीडियावर हा विनोदी व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अनेक यूजर्सनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. या व्हिडीओखाली कमेंट्स सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी बालपणीच्या आठवणीसुद्धा शेअर करण्यास सुरूवात केलीय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video today funny video trending video google trends schools student was having fun in front of teacher see what happened then omg video went viral prp

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या