Koli song dance: सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्व जण बिनधास्त डान्स करताना दिसतात. शाळा कॉलेजातील मुलांचे सुद्धा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.काही लोक तर सार्वजनिक ठिकाणीही बिनधास्त डान्स करुन त्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. सोशल मीडिया हे लोकांसाठी आपल्या कला सादर करण्याचे एक अनोखे माध्यम बनले आहे. कोणी डान्स, तर कोणी स्टंट, तर कोणी चित्रकलेच्या माध्यमातून आपले कौशल्य जगासमार मांडतात. गेल्या काही दिवसांपासून आगरी तरुणींचा डान्स हा नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. काय ती अदा, काय तो नखरा, काय ते डान्स स्टेप्स या तरुणींचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकदा पाहून पण नेटकऱ्यांचं मन भरतं नाही आहे. ते हा व्हिडीओ वारंवार पाहतं आहेत. आतापर्यंत या व्हिडीओ हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून प्रत्येका तोंडून एकच वाक्य निघतंय क्या बात है.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कार्यक्रमात एकूण या ७ तरुणी भन्नाट डान्स करत आहेत.कोळी गाण्यावर या तरुणींनी जबरदस्त असा डान्स केला आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. डान्स व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा डान्स आणि एकेक अदा इतक्या सुंदर आहेत की पाहणाऱ्याला आपोआप भुरळ पडते. त्यांच्या या अदांवर नेटकऱ्यांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणीच्या डान्स प्रमाणेच त्यांच्या लूकनेही पाहणाऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे.
अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं. सध्या अशाच एका तरुणीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर me_the_open_heart या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी या मुलींचे कौतुक केले आहे. एका युजरने “आगरी पोरींचा नाद नाय” असे म्हटले आहे तर दुसऱ्या एकाने तायडे भारीच डान्स केला असे म्हटले आहे. यासांरख्या अनेक प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.