Anna Mani 104th Birth Anniversary: भारताच्या पहिल्या महिला वैज्ञानिक ॲना मणी (Anna Mani) यांच्या १०४ व्या जयंती निमित्त गूगलने आज खास डूडल साकारलं आहे. ॲना मणी या हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होत्या. हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी विकसित केलेल्या अभ्यासामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. तत्कालीन पितृसत्ताक समाजात पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात काम करून अव्वल स्थानी पोहचणाऱ्या ॲना मणी या एक आदर्श आहेत. त्यांच्या जयंती निमित्त गूगलने साकारलेले डूडल सुद्धा तितकेच खास आहे. आज आपण ॲना मणी यांचे भारतीय विज्ञानाच्या प्रगतीतील योगदान जाणून घेणार आहोत..

ॲना मणी यांच्याविषयी..

२३ ऑगस्ट १९१८ मध्ये केरळमधील एका सीरियन ख्रिश्चन कुटुंबात ॲना मणी यांचा जन्म झाला होता. कुटुंबातील आठ भावंडांपैकी त्या सातव्या होत्या. १९३९ मध्ये चेन्नईच्या पी पचयप्पास कॉलेजमधून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात पदवी प्राप्त करून त्याच वेळी त्यांनी पाच शोधनिबंध प्रकाशित केले. १९४५ मध्ये, लंडनच्या इंपीरियल कॉलेजमध्ये भौतिकशास्त्रात पदवीचे शिक्षण त्यांनी सुरु केले. १९४८ मध्ये लंडनहून परत आल्यानंतर ॲना मणी पुण्यातील भारतीय हवामानशास्त्र विभागात रुजू झाल्या, जिथे त्यांच्याकडे हवामान यंत्रांची व्यवस्था करण्याची जबाबदारी होती.

ai technology marathi crime news
“मी इन्स्पेक्टर विजयकुमार बोलतोय..”, AI चा वापर करून ५८ वर्षीय महिला प्राध्यापिकेची फसवणूक; १ लाखांचा गंडा!
America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती
candidates tournament 2024 marathi news, candidates tournament 2024 chess marathi news
विदित, प्रज्ञानंद, गुकेश… यांच्यातील कोणी विश्वनाथन आनंद बनेल?
america on arvind kejriwal arrest
Video: भारताच्या निषेधानंतरही अमेरिका भूमिकेवर ठाम; द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव? प्रवक्ते म्हणतात, “आमचं बारीक लक्ष आहे!”

वेदर वुमन ऑफ इंडिया

ॲना मणी यांनी भौतिकशास्त्र आणि हवामानशास्त्रात केलेल्या संशोधनामुळे भारताला हवामानाचा अचूक अंदाज लावणे शक्य झाले. म्हणूनच ॲना मणी यांना “वेदर वुमन ऑफ इंडिया” म्हणून देखील ओळखले जाते.

भारताला सस्टेनेबल व पुनर्वापरातील ऊर्जास्रोतांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी एक भक्कम पाया रचून ठेवला होता. प्राध्यापक सी व्ही रमन यांच्या हाताखाली रुबी आणि डायमंडच्या ऑप्टिकल गुणधर्मांवर त्यांचे संशोधन प्रसिद्ध आहे.

आपल्या कर्तबगारीने काहीच काळात ॲना मणी नंतर भारतीय हवामान विभागाच्या उपमहासंचालक बनल्या व संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेत अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांची नेमणूक झाली. १९८७ मध्ये, त्यांनी विज्ञानातील उल्लेखनीय योगदानासाठी के.आर. रामनाथन पदक जिंकले आहे.