जगभरात आज ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहात नाताळाचा सण साजरा करत आहे. हा सुट्ट्यांचा आठवडा आहे. अशा खास दिवशी गुगलकडून खास डुडल जारी केलं नाही तर नवलच! तर यावेळी गुगलनं ‘December Global Festivities’ हे डुडल प्रकाशित केलं आहे. खर तर आपल्याकडे वर्षभर काहीना काही सण सुरू असतात. तेव्हा आपल्याला सुट्ट्या भरपूर असतात. पण, पाश्चिमात्य देशात अनेक ठिकाणी मात्र नाताळातच मोठी सुट्टी असते. तेव्हा बाहेर कुठेतरी फिरायला जाणं, आपल्या मित्रपरिवारासोबत नाताळ साजरा करणं असे अनेक प्लान असतात आणि याच छोट्या मोठ्या आनंदाच्या क्षणाला गुगलनं डुडलमार्फत उजाळा दिला आहे. तेव्हा वर्षातून एकदाच मोठी सुट्टी अनुभवणाऱ्या अनेकांना गुगलचं हे डुडल भावलं नाही तर नवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इच्छा माझी पूर्ण करा! ६ वर्षांच्या चिमुकलीच्या मदतीला धावले ९०० सांता

विशेष म्हणजे हा आनंद दाखवण्यासाठी गुगल पेंग्विन आणि पोपटाचं कुटुंब आपल्या डुडलमधून दाखवलं आहे. गुगलनं ‘December Global Festivities’ ची मालिका तयार केली आहे. या मालिकेतलं पुढचं डुडल आता ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला गुगल प्रसिद्ध करणार आहे. तेव्हा यात पेंग्विन आणि पोपटाच्या कथेत वेगळं काय पाहायला मिळणार? याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

तुम्हाला माहितीये ‘ख्रिसमस ट्री’ची शेतीही केली जाते?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google doodles celebrates december global festivities with penguin parrot family
First published on: 25-12-2017 at 10:51 IST