Google Gemini Saree Trend: सोशल मीडियावर सध्या गुगल जेमिनी ट्रेंड्सची क्रेझ पाहायला मिळतेय. सध्या जिकडे पाहावं तिकडे गुगल जेमिनीच्या Banana AI Saree Trend सुरु आहे. या ट्रेंडने तर इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. सगळेजण आपले साडीतले फोटो अपलोड करताना दिसत आहेत. पण हे तंत्रज्ञान जेवढं मजेशीर वाटत आहे त्याहीपेक्षा ते खतरनाक आहे.ज्याचा अनुभव एका महिलेला आला आहे. तिने स्वत: तिचा त्याबद्दलचा भयानक अनुभव सोशल मीडियावर सांगितला आहे.हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
कोट्यवधी लोक वापरत असलेलं टूल सुरक्षित असल्याचा दावा गुगलकडून करण्यात आला आहे. पण एका इन्स्टग्राम यूझरनं तिच्यासोबत झालेला भीतीदायक प्रकार कथन केला. त्यामुळे अनेकांना प्रायव्हसीची चिंता सतावू लागली आहे.
झलक भवनानी नावाच्या तरुणीनं इन्स्टाग्राम वर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. गुगल जेमिनीच्या नॅनो बनानानं दिसत नसलेला तीळ फोटोत कसा दाखवला, याबद्दल झलकनं सांगितलं आहे. इन्स्टाग्राम यूझर झलकनं तिच्या सोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे. ती म्हणते, ‘मी एक फोटो तयार केला आणि मला त्यात काहीतरी भीतीदायक आढळून आलं. इन्स्टाग्रामवर आता एक ट्रेंड व्हायरल होतोय. त्यात तुम्ही जेमिनीवर तुमचा फोटो अपलोड करता आणि जेमिनी तो तुम्हाला साडीमध्ये कन्वर्ट करुन देतो. काल रात्री मीदेखील हा ट्रेंड फॉलो केला. तुम्हाला स्क्रीनवर ही इमेज दिसतेय. हा फोटो मी जेमिनीमध्ये अपलोड केला होता. त्या फोटोत मी हिरव्या रंगाचा पूर्ण बाह्या असलेला सूट परिधान केला होता. या इमेजसोबत मी प्रॉम्प लिहिला होता आणि जेमिनीनं मला हा फोटो दिला. मला हा फोटो खूपच आकर्षक वाटला,’ असं झलकनं सांगितलं.
पाहा व्हिडीओ
व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोक देत आहेत. एका वापरकर्त्याने यामागे एक सिद्धांत मांडला, लिहिले, “बरं, एआय अगदी असंच काम करते. एआय तुमच्या डिजिटल फूटप्रिंटवरून, तुम्ही ऑनलाइन अपलोड करत असलेल्या सर्व प्रतिमांमधून माहिती काढते. म्हणून जेव्हा तुम्ही एआयला प्रतिमा तयार करण्यास सांगता तेव्हा ते तुमच्या भूतकाळातील अपलोडचा देखील वापर करेल. तुमचा तीळ तुमच्या इतर चित्रांमध्ये दिसतो. काळजी घेणे चांगले. एआय ही खरोखर समस्या नाही, आपण स्वतःची माहिती जास्त शेअर करणे ही समस्या आहे.”