कल्पना करा तुम्ही चुकूनमाकून शत्रूच्या राज्यात आहात. पण तिथे मात्र शांतता आहे, दूरदूरपर्यंत शत्रूचा पत्ताच नाही त्यामुळे तुम्हीही गाफिल आहात. पण अगदी त्याचवेळी शेकडो शत्रू एकाकी असलेल्या तुमच्यावर तुटून पडले तर ? अशा संकटात सापडल्याची साधी कल्पना जरी आपण डोक्यात आणली तरी घाम फुटतो. एकाकी आणि तेही शत्रूंच्या राज्यात अडकल्यावर त्यांच्याविरुद्ध लढा देणे तर दूरच पण जीवंत राहण्याचीही खात्री नसते. तुमच्या मनात असे नकारात्मक विचार येत असतील तर सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नक्की पहा. शेकडो सापांच्या विळख्यात सापडलेली घोरपड आपली कशी सुटका करून घेते आणि कशी सुखरुप आपल्या घरी परतते याचा व्हिडिओ इंटरनेटवर खूपच गाजतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समुद्रकिनारी असलेली घोरपड आजूबाजूला नजर फिरवून सुरक्षित असल्याची खात्री करत निश्चिंत उभी आहे. आजूबाजूला अगदी निरव शांतता पसरली आहे. असे असताना एका पाठोपाठ एक असे शेकडो साप अचानक तिची शिकार करण्यासाठी तिला घेरतात. त्यांची नजर चुकवत ही घोरपड कशीबशी पळ काढते. पण पुढे अचानक दहा बारा साप तिच्यावर तुटून पडतात. आता या घोरपडीचा खेळ खल्लास असेच सगळ्यांना वाटते पण ही घोरपड अत्यंत शिताफिने या सापांच्या विळख्यातून पळ काढण्यात यशस्वी होते. सापांचे दुष्टचक्र फक्त इथेच थांबत नाही. तर किना-यावर असणा-या खडकांतून पळ काढताना हे साप तिथेही तिचा पाठलाग करतात. पण ही चपळ घोरपड परिस्थितीपुढे हार न मानता, सापांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यात यशस्वी होते. या व्हिडिओला सोशल मीडियावर तूफान पसंती मिळत असून आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great escape of lizard
First published on: 08-11-2016 at 13:15 IST