Viral video: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. त्यामुळे हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या परीने खास प्रयत्न करत असतो.लग्नाच्या सिजनमध्ये डान्सचे व्हिडीओ आणि मजेदार क्षणाचे व्हिडीओ व्हायरल होतात. लग्न असेल आणि धमाकेदार डान्स नसेल तर ते होऊ शकत नाही. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
लग्न म्हटलं की मजामस्ती, नाच-गाणी, धिंगाणा पाहायला मिळतोच. लग्नातील विविध प्रथांमध्ये खूप गमतीशीर गोष्टी पाहायला मिळतात. त्याशिवाय लग्नात कधी काय घडेल हेदेखील सांगता येत नाही. लग्नात हार घालण्यावरूनही अनेकदा गोंधळ उडतो; तर कधी नवऱ्या मुलाचे बूट चोरण्यावरूनही राडा झालेला पाहायला मिळतो. अशी मजामस्ती करण्यामागे अनेकदा नवरदेवापेक्षा त्याचे मित्रच जास्त उत्साही असतात. अनेकदा हे मित्र आपल्या नवरदेव मित्राची त्याच्या भावी पत्नीसमोर कशी मजा घेता येईल, यासाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात. तसेच काही मित्र आपल्या नवरदेव मित्रासाठी खास डान्सदेखील करतात. आता अशाच एका लग्नातील मजेशीर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात नवरदेवाचे मित्र डान्स करताना दिसत आहेत.
आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा य मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र सध्या काही मित्रांचा डान्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. यावेळी मित्रांनी “ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं…” या मराठमोळ्या गाण्यावर तुफान डान्स केलाय.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rj10_the_cricket_love या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाल्या आहेत. तसेच यावर दोन मिलियनहून अधिक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त असे मित्र पाहिजेत.