जगात काही असेही लोक आहेत जे खूप विचित्र विचित्र पदार्थ बनवतात आणि खातातही. लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटवर हे विचित्र पदार्थांचे व्हिडिओ शेअर करत असतात. या विचित्र पदार्थांना लोक फ्यूजन फूड असेही म्हणतात.नवीन ट्राय करण्याच्या नादात काही लोक त्या पदार्थांचं पूर्ण रूप पालटून टाकतात. अशातच एक विचित्र फूड कॉम्बिनेशन्सबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांची चव चाखण्याचा विचार तुम्ही कदाचित स्वप्नातही करू शकणार नाही. पाणीपुरी आवडत नाही असा व्यक्ती विरळच. प्रत्येक शहरातील वेगवेगळ्या भागातील पाणीपुरी फेमस असते. ही पाणीपुरी खाण्यासाठी नेहमी गर्दी असते. मात्र तुम्ही कितीही पाणीपुरी लव्हर असला तरी या पाणीपुरीला तुम्ही नकार द्याल.

कारण एका पाणीपुरी विक्रेत्यानं पाणीपुरीमध्ये बटाट्याएवजी चक्क केळी भरली आहे. या व्हिडीओमध्ये एक विक्रेता एका भांड्यात केळी सोलताना दिसत आहे. व्यक्ती सोललेली केळी स्मॅश करते मग त्यात हरभरा, मसाले आणि हिरवी कोथिंबीर मिसळून पाणीपुरीचं स्टफिंग तयार करते. ही केळी पाणीपुरी तो विकत असून लोकही या पाणीपुरीवर ताव मारताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त…आजोबांच्या तळहातावर उभा राहून नातवाचा मनसोक्त डान्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक स्ट्रीट विक्रेता अनेकांचे आवडते स्ट्रीट फूड ‘पानीपुरी’ बनवत आहे. हा व्हिडिओ पाहून पाणीपुरीप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत असे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा व्हिडिओ २२ जून रोजी मोहम्मद फ्युचरवाला (@MFuturewalla) नावाच्या वापरकर्त्याने पोस्ट केला होता आणि आतापर्यंत या व्हिडीओ ४५ हजारांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे.