कॅलिफोर्नियामधल्या एका गुरूद्वा-याने युबामधल्या बेघरांना आसरा देऊ केला आहे. युबामध्ये धरण फुटलं त्यामुळे या भागात राहणारे हजारो लोक बेघर झाले होते. या दुर्घटनाग्रस्त कुटुंबासाठी येथल्या गुरुद्वाराने आपले द्वार खुले केले आहे. गुरुद्वारामध्ये राहायला येणा-या लोकांसाठी अन्न आणि राहण्याची सोय केली आहे. तसेच त्यांच्यासाठी २०० हून अधिक शौचालय आणि स्नानगृह या परिसरात उभारण्याचे कामही सुरू झाले आहे.
वाचा : घरभाडे देण्यासाठी पैसे नसल्याने बसमध्येच थाटला संसार
अमेरिकेतल्या युबामध्ये धरण फुटल्याने या परिसरात राहणा-या अनेक लोकांना आपले घरदार सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले. या आपत्तीमुळे रातोरात या परिसरात राहणारे लोक बेघर झाले आहेत. युबा भागात अमेरिकनबरोबर अनेक भारतीय वंशांचे लोक राहतात. या सगळ्यांच्या राहण्याची सोय इथे करण्यात आली आहे. २ लाखांहून अधिक लोकांची क्षमता असलेल्या या गुरूद्वा-यात अनेक कुटुंब आस-यासाठी येत आहेत. आलेल्या कुटुंबाची सेवेकरी सेवा करत आहे. लोकांना अन्न मिळावे यासाठी १९ सेवक सतत स्वयंपाक घरात जेवण बनवण्याच्या कामात गुंतले आहे.
वाचा : बलात्कारपीडितेशी लग्न करत तरूणाचा आरोपींविरोधात लढा
युबा भागात ७० हजार शिख लोक राहतात. एका वृत्तानुसार १०० हून अधिक कुटुंब या गुरूद्वा-यात आरसा घेण्यासाठी आले आहे. सोशल मीडियावर गुरूद्वाराच्या या मदतीची माहिती व्हायरल होत आहे आणि या पोस्ट वाचून अनेक बेघर येथे राहण्यासाठी येत आहे.