हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आध्यात्मिक आणि शैक्षणिक मार्गदर्शकांप्रति अर्थात गुरुप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष दिवस साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. यंदा आषाढ महिन्याची पौर्णिमा ३ जुलै रोजी आहे. या दिवशी महाभारताची रचना करणारे महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता. परंतु, गुरुपौर्णिमा उत्सवाच्या तारखेबाबत काही लोकांच्या मनात संभ्रम आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूची पूजा करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.

गुरुपौर्णिमा कोणत्या तारखेला होणार साजरी?

हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ शुक्ल पक्षाची पौर्णिमा २ जुलै रोजी रात्री ८.२१ वाजता सुरू होईल आणि ही तिथी ३ जुलै रोजी संध्याकाळी ५. ०८ वाजता समाप्त होईल. ज्या शिक्षकांनी, गुरूंनी आपले अज्ञान दूर करत ज्ञान दिले त्यांच्या स्मरणार्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी अनेक विधी आणि परंपरा पाळल्या जातात. तसेच अनेक अनुयायी मंदिरे, आश्रम आणि शैक्षणिक संस्थांमध्ये एकत्र येत आपल्या गुरूसमोर नतमस्तक होत आशीर्वाद घेतात. यावेळी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांच्या गुरूंना पुष्पगुच्छ, फळे आणि काही भेटी देत त्यांचे कौतुक करतात.

गुरुपौर्णिमेचे महत्त्व

आध्यात्मिक गुरू, शिक्षक यांचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित दिवस म्हणून गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. गुरू आपल्या शिष्यांना मार्गदर्शन आणि प्रबोधन करताना बजावत असलेल्या भूमिकेची एक आठवण करून देणारा हा दिवस असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याबाबतच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही; तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)