Viral video: एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. अशी अनेक जोडपी असतात ज्यांना घरातून नात्यासाठी परवानगी नसते. अशावेळी जगाची पर्वा न करता ही जोडपी गुपचूप एकमेकांना भेटतात. मांजर दुध पिताना डोळे बंद करून पिते म्हणून तिला वाटते की मला कोणीही पाहत नाही” मात्र तिला सगळे पाहत असतात. असंच काहीसं या प्रेमात पडलेल्या तरुणाईचं असतं. घरच्यांचा डोळा चुकवून ते एकमेकांना भेटतात खरे पण कधीतरी ते सापडतातच. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या बॉयफ्रेंडला घरच्यांनी पकडलं अन् नंतर काय झालं ते तुम्हीच पाहा..

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तरुणीच्या घरच्यांनी तरुणाला एका रुमच्या कोपऱ्यात उभे केलं आहे तसेच त्याच्या हाताला एका कापडाने बाधुंन ठेवलेले आहे. यावेळी एक महिला या तरुणाला जोरजोरात मारत आहे. महिला त्याला कानाखाला मारताना दिसत आहे तसेच काहीतरी बोलत आहे. त्यानंतर ती त्याला चप्पलेनंही मारताना दिसत आहे. हा तरुण मात्र मान खाली घालून उभा असल्याचं दिसत आहे. आणखी एक तरुणही तिथे उभा असलेला दिसत आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धरालं.

Women Manipur violence Update
Manipur Violence : “पीडित महिला पोलिसांच्या वाहनात बसल्या, पण…”; नग्न धिंडप्रकरणी सीबीआयच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे
Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा
two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: दिल्लीत मुलांची वाट पाहणाऱ्या बापावर गायीचा प्राणघातक हल्ला; रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @gharkekaleshया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तरुणाची मस्करी करत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘तुम्ही खूप चांगलं केलं आहे, इतर लोकांनीही असंच केलं पाहिजे.’