टी सीरिजचे मालक भूषण कुमार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. यावेळी ते ‘हनुमान चालिसा’मुळे चर्चेत आहेत. टी सीरिजने अपलोड केलेल्या ‘हनुमान चालिसा’च्या व्हिडीओला विक्रमी व्हूज मिळाले आहेत. असा विक्रम करणारा हा भारतातील पहिला व्हिडीओ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी सीरिज हे युट्यूबवरील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चॅनेलपैकी एक आहे. ९ मे २०११ साली या चॅनेलवर ‘हनुमान चालिसा’चा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या नऊ वर्षात हा व्हिडीओ तब्बल एक अब्ज वेळा पाहिला गेला आहे. असा विक्रम करणारा हा भारतातील पहिला युट्यूब व्हिडीओ आहे.

भूषण कुमार यांनी ट्विट करुन ही माहिती चाहत्यांना दिली. “टी सीरिजच्या कुटुंबियांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आपल्या हनुमान चालिसाच्या व्हिडीओला एक अब्ज व्हूज मिळाले आहेत. बाबा तुम्ही असाच आशिर्वाद आम्हाला देत राहा जेणेकरुन आणखी मोठे विक्रम आम्ही प्रस्थापित करत राहू.” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. भूषण कुमार यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी टी सीरिजला या नव्या विक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hanuman chalisa video make record cross 1 billion views on youtube mppg
First published on: 28-05-2020 at 10:39 IST