बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळख असणाऱ्या सलमान खानला त्याचे चाहते प्रेमाने भाई म्हणून हाक मारतात. त्यामुळेच मनोरंजन सृष्टी असो किंवा इंटरनेटवरील ट्रेण्ड्स भाई म्हटल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर सलमानचाच चेहरा येतो. सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशी २७ डिसेंबर रोजी दरवर्षी ‘Happy Birthday Bhai’ हा ट्रेण्ड ट्विटरवर पाहायला मिळतो. मात्र आज म्हणजेच २४ सप्टेंबरलाच ट्विटरवर  ‘Happy Birthday Bhai’ ट्रेण्ड होताना दिसत आहे. या ट्रेण्डवर हजारोच्या संख्येने ट्विट्स पडले आहेत. मात्र अचानक नेटकरी कोणत्या भाईला शुभेच्छा देत आहेत असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरवर अचानक ‘Happy Birthday Bhai’ का ट्रेण्ड होत आहे हे अनेकांना ठाऊक नाहीय. अनेकजण Happy Birthday Bhai का ट्रेण्ड होत आहे हे विचारण्यासाठी हे शब्द वापरुन ट्विट करत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे काही जणांनी या ट्रेण्डमध्ये भाजपाचे दिल्लीमधील नेते आणि प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीत अनेक ठिकाणी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’ असा आशय असलेले होर्डिंग्ज बग्गा यांनी २०१८ साली लावले होते. त्यानंतर बग्गा चर्चेत आले होते. २०१९ साली त्यांनी दिल्लीमधून विधानसभा निवडणूकही लढवली होती. अनेकदा सोशल नेटवर्किंगवर भाजपाच्या समर्थानर्थ हॅशटॅग ट्रेण्ड करण्यासाठी नेटकऱ्यांमध्ये बग्गा ओळखले जातात. बग्गा हे ट्विटरवर अत्यंत सक्रीय आहेत. मध्यंतरी दिल्लीतील जवाहरलाल विद्यापीठामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी गेली होती. त्यानंतर दीपिकाविरोधात सोशल नेटवर्किंगवर कॅम्पेन चावलण्यामध्ये बग्गा आघाडीवर होते. त्यांनी दीपिकाच्या छपाक या चित्रपटाच्या विरोधात आवाज उठला होता. तसेच या चित्रपटाऐवजी त्याच कालावधीत प्रदार्शित झालेल्या तान्हाजी चित्रपटाला जाण्याचे आवाहन त्यांनी ट्विटवरुन केलं होतं. इतकचं नाही तर त्यांनी तान्हाजीची काही तिकिटेही मोफत दिली होती.

मात्र बग्गा यांना शुभेच्छा देण्याबरोबरच अनेकजण Happy Birthday Bhai हा टॉपिक आपल्या ओळखीच्या लोकांना तसेच जवळच्या मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी वापरत असल्याचे दिसत आहे. एकंदरितच हा टॉपिक ट्रेंडिंग असला तरी अनेकजण या टॉपिकमुळे बुचकाळ्यात पडले आहेत. काहींनी तर या विषयावर का बोलताय हे विचारण्यासाठी लोकं या तीन शब्दांचा वापर करत असल्यानेच हे शब्द ट्रेण्डमध्ये आल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday bhai trending on twitter and no one knows why scsg
First published on: 24-09-2020 at 10:18 IST