मैत्रीचे नाते रक्ताचे नसले तरी ते अनेकांसाठी खूप खास असते. आयुष्यातील सर्व सुख-दुख, गुपिते, प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी कसलाही विचार न करता आपण ज्या व्यक्तीसोबत शेअर करु शकतो तो आपला खरा मित्र किंवा मैत्रीण असते. आयुष्यात पॉवर बँक म्हणून मदत करतात, साथ देतात ते म्हणजे खरे मित्र. याच खास मैत्रीच्या नात्यासाठी दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जाते. यानिमित्ताने आपण आपल्या खास मित्र- मैत्रिणींना शुभेच्छा देतो, या फ्रेंडशिप डेचा उल्लेख होतात एक खास गोष्ट लगेच डोळ्यासमोर येते, ती म्हणजे विविध रंगाचे फ्रेंडशिप बँड.

तुम्हीही शाळेत असताना विविध रंगाचे फ्रेंडशिप बँड आपल्या मित्र मैत्रिणींच्या हातावर बांधून फ्रेंडशिप डे साजरा केला असालच. मात्र फ्रेंडशिप बँडच्या प्रत्येत रंगामागे एक खास अर्थ दडलेला आहे, जो तुमच्या मैत्रीत नवा रंग भरतात. या फ्रेंडशिप डेनिमित्त आपण फ्रेंडशिप बँडच्या रंगांचा अर्थ जाणून घेऊया…

१) रोज गोल्ड

ज्यांना त्यांच्या मित्रांबद्दल उदारता आणि आनंद व्यक्त करायचा आहे त्यांच्यासाठी रोज गोल्ड रंग योग्य आहे. तुमची मैत्री आणखी घट्ट करण्यासाठी तुम्ही हा रंग निवडू शकता.

२) रेड / कोरल

हा एक बोल्ड फ्रेंडशिपचा रंग आहे. ज्या मित्रांना तुम्हाला गुड लक बोलायाचे आहे त्या मित्रांना तुम्ही रेड रंगाचा फ्रेंडशिप बँड बांधून शुभेच्छा देऊ शकता. तुमची मैत्री अजून मजबूत करण्यासाठी तुम्ही या रंगाचे फ्रेंडशिप बँड निवडू शकता.

३) ब्लू

ब्लू हा अतिशय सुंदर रंग आहे. हा रंग धैर्याचे प्रतीक देखील मानले जाते. तुमच्या मित्राला त्याच्या ताकदीची जाणीव करुन देण्यासाठी तुम्ही या रंगाचा बँड निवडू शकता.

४) यलो

यलो रंग हा पॉझिटिव्ह फिलिंग देणारा असतो. ज्या मित्र- मैत्रिणींशी बोलून आणि त्यांच्यासोबत असताना तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. अशा मित्रांना तुम्ही या रंगाचा बँड बांधू शकता.

५) ब्लॅक

ब्लॅक हा एक बोल्ड आणि स्ट्राँग रंग आहे, जो एक पॉझिटिव्ह एनर्जी रिप्रेजेंट करतो. ज्या मित्रांसोबत तुमचे खूप घट्ट नाते आहे त्यांना ब्लॅक फ्रेंडशिप बँड बांधा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६) ग्रीन

कोणत्याही मजबूत नातेसंबंधात खरेपणा हा महत्त्वाचा भाग असतो. ज्या मित्रांवर तुम्ही डोळे बंद करुनही विश्वास ठेऊ शकता त्यांना तुम्ही ग्रीन रंगाचा फ्रेंडशिप बँड बांधू शकता.