कीटकांना पाहून जर तुम्ही घाबरत असाल, तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी नाही आहे. तुम्ही अनेकवेळा ‘झोम्बी’ बद्दल ऐकले असेलच. यावर अनेक चित्रपटही आले आहेत. पण तुम्ही कधी ‘झोम्बी किडा’ बद्दल ऐकले आहे का? होय, तुम्ही हे अगदी बरोबर वाचले आहे. तुम्हाला झोंबी किड्याबद्दल वाचून नक्कीच नवल वाटलं असेल. मात्र, आजकाल अशाच एका कीटकाच्या व्हिडीओने इंटरनेटच्या जगात खळबळ माजवली आहे. या किड्याला Zombie Cicadas असेही म्हणतात. हा किडा एक हलणारे प्रेत आहे, ज्याचा मेंदू परजीवी शिकारीद्वारे नियंत्रित केला जातो. झोम्बी वर्म्सचा हा व्हिडीओ एक कोटीहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक कीटक चालताना दिसत आहे. पण तो जिवंतही नाही आणि मृतही नाही. उदाहरणार्थ, हा किडा झोम्बी बनला आहे. तुम्ही हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिले असेल की झोम्बी बनल्यानंतर मृत व्यक्तीही जिवंत राहते आणि इतरांना चावून इतर मानवांमध्ये झोम्बी विषाणू पसरवते. व्हायरल क्लिपमध्ये, कीटकाच्या शरीरातील काही भाग गायब असल्याचे आपण पाहू शकता, परंतु असे असूनही, तो जिवंत आहे. खरं तर, त्याचे अवयव प्राणघातक परजीवीने खाल्ले आहेत आणि तो आता त्या कीटकाच्या मेंदूवर नियंत्रण ठेवत आहे.

mysterious human like shiny objects floating viral video
एलियन की UFO, हे नक्की काय आहे? आकाशात चमकणारी ‘ही’ गोष्ट नेमकी कोणती? Video पाहून व्हाल चकित
a man flying a kite while standing at the train gate video goes viral on social media
धक्कादायक! चक्क ट्रेनच्या दरवाजावर उभा राहून तरुण उठवतोय पंतग; VIDEO व्हायरल
robbing shopkeepers
दुकानदारांना लुटण्याचा हा नवीन प्रकार तुम्ही पाहिला आहे का? व्हिडीओ पाहा अन् सतर्क व्हा
Watch this video before eating strawberries
स्ट्रॉबेरी खाण्याआधी हा व्हिडीओ एकदा बघाच! पुन्हा आयुष्यात कधीही खाणार नाही

( हे ही वाचा: VIRAL VIDEO : चक्क दोन मधमाशांनी उघडले फँटाच्या बाटलीचे झाकण; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल)

येथे झोम्बी किड्याचा भयानक व्हिडीओ पहा

( हे ही वाचा: VIDEO: दहीहंडी फोडायला चढलेल्या ‘गोविंदा’चा सातव्या थरावरून पडून मृत्यू; कॅमेऱ्यात कैद झाली धक्कादायक घटना)

@Rainmaker1973 या हँडलवरून या विचित्र कीटकाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. माहिती देताना वापरकर्त्याने लिहिले की, ‘हा एक झोम्बी किडा आहे जो जिवंत किंवा मृत नाही. मोठ्या संख्येने प्राणघातक परजीवी कीटकांच्या मेंदूवर नियंत्रण ठेवत आहेत, जे बीजाणूंचा प्रसार करून अधिकाधिक कीटकांना संक्रमित करतात आणि त्यांना अशा प्रकारे जिवंत ठेवतात.

हा व्हिडीओ १३ सेकंदाचा असून आतापर्यंत १० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. याशिवाय १.६४ लाख लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे, तर ३० हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर हजारो लोकांनी व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. झोम्बी किड्याचा हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत.