उद्या, म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. दरम्यान, या विशेष प्रसंगी प्रत्येक भारतीय एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहे. यानिमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जगभरातून भारताला शुभेच्छा देण्यात येत आहेत. दरम्यान, त्यातील एक शुभेच्छा संदेश हा अतिशय खास आणि वेगळा आहे. कारण हा शुभेच्छा संदेश थेट अंतराळातून पाठवण्यात आला आहे. हा संदेश इटालियन अंतराळवीर समंथा क्रिस्टोफोरेटीने आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातून पाठवला आहे. क्रिस्टोफोरेटीने अवकाशातून व्हिडीओ संदेश पाठवून या विशेष प्रसंगी भारताचे अभिनंदन केले आहे.

केवळ भारतच नाही, तर ‘हे’ देशही १५ ऑगस्ट रोजी साजरा करतात स्वातंत्र्य दिन; जाणून घ्या त्यांच्या संघर्षाची कथा

या व्हिडीओ संदेशात अंतराळवीर समंथा क्रिस्टोफोरेटी यांनी भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करताना आनंद व्यक्त केला आहे. क्रिस्टोफोरेटी एक युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) अंतराळवीर आहे आणि सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आहे. त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) ‘गगनयान’ कार्यक्रमाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. हा व्हिडीओ इस्रोच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. १ मिनिट १३ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये क्रिस्टोफोरेटी इस्रो एजन्सीला शुभेच्छा देताना दिसत आहे.

संदेशात, ती पुढे म्हणते की, अनेक दशकांमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या सहकार्याने अनेक अवकाश आणि मोहिमांवर काम केले आहे. इस्रोने तयार केलेल्या दोन मोठ्या प्रकल्पांबद्दल बोलताना, समंथा म्हणाली की इस्रो आगामी निसार अर्थ सायन्स मिशनच्या विकासावर काम करत आहे, ज्यामुळे आपल्याला आपत्तींचा मागोवा घेण्यात मदत होईल आणि ते आपल्याला बदलत्या हवामानाची अधिक चांगली समज मिळविण्यातही मदत करेल.

Photos : ‘हर घर तिरंगा’ मोहीम साजरी करण्याआधी वाचा ध्वजासंबंधीचे ‘हे’ महत्वाचे नियम; अन्यथा होऊ शकते कारावासाची शिक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे क्रिस्टोफोरेटी म्हणाली की, ईएसए, नासा आणि सर्व आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या वतीने मी इस्रोला शुभेच्छा देऊ इच्छिते. इस्रो गगनयान कार्यक्रमावर काम करत आहे आणि मानवांना अवकाशात पाठवण्याच्या तयारीत आहे. विश्वाचा शोध घेण्यासाठी आमच्या भागीदारीचा विस्तार इस्रोसोबत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १.२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.