रस्त्यावरुन वाहन चालवताना चालकाने सावधगिरी बाळगणे फार गरजेचे असते, अन्यथा भीषण अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी सरकारनेही वाहतुकीसंदर्भात अनेक नियम केले आहेत. ज्याचे प्रत्येक वाहन चालकाने पालन करणे बंधनकारक असते. पण काही चालक हे नियम गांभीर्याने न घेतला धोकादायक पद्धतीने गाडी चालवतात आणि स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालतात. सध्या असाच एका बस चालकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तो चालक चक्क गाडी चालवताना हुक्का ओढत असल्याचे दिसतेय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसलाय.

व्हिडीओत बस चालक एका हातात गाडीचे स्टेअरिंग आणि दुसऱ्या हाताने हुक्क्याचा पाईप पडून खुलेआमपणे हुक्का ओढतोय. हा व्हिडीओ हरियाणामधील असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक मोठी बस रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाताना दिसतेय. पण जेव्हा व्हिडीओ बनवणारी व्यक्ती बसच्या ड्रायव्हरकडे कॅमेरा नेते तेव्हा बघणारे सगळेच अवाक् झाले. कारण बसचालक एका हाताने बसचे स्टेअरिंग आणि दुसऱ्या हातात हुक्काचा पाईप धरुन ओढतोय. बस चालवताना अशाप्रकारे नशा करणे चालक आणि प्रवाशांच्या जीवासाठी देखील धोकादायक आहे, तरी कसलीही भीती न बाळगता ड्रायव्हर खुलेआमपणे हुक्का ओढताना दिसतोय.

a woman stole from a another woman purse now the video is going viral on social media
“काकी तर एकदम प्रोफेशनल चोर निघाल्या’; दुकानात आल्या अन् क्षणात पर्स चोरी करुन निघाल्या; पाहा Video
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Kiran Mane Post Viral
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल

हा धक्कादायक व्हिडीओ @HasnaZaruriHai नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना अकाऊंट यूजरने ही हरियाणा रोडवेज बस असल्याचे सांगितले आहे. व्हिडिओमध्ये बसवरही ‘हरियाणा रोडवेज दिल्ली’ असे लिहिलेले दिसत आहे. याशिवाय बसचा क्रमांकही व्हिडिओमध्ये लिहिलेला दिसत आहे. दरम्यान अनेकांनी व्हिडीओतील बस चालकाच्या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे, तसेच काहींनी बस चालकावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.