अल्बिनो मगर हे अत्यंत दुर्मिळ प्राणी आहेत. या मगरी हे असे जीव आहेत ज्या अल्बिनिझमचे रेसेसिव्ह जनुक म्हणून ओळखल्या जातात. याचा अर्थ त्यांच्या त्वचेला किंवा डोळ्यांना रंग देण्यासाठी मेलेनिन तयार करण्याची क्षमता त्यांच्यात नाही. या अनुवांशिक दोषामुळे त्यांची त्वचा पांढरीशुभ्र दिसते आणि रंगहीन बुबुळांमध्ये रक्तवाहिन्या दिसत असल्यामुळे डोळे सामान्यतः गुलाबी रंगाचे असतात.

जो रेप्टाइल झू प्रागैतिहासिक इंकचे संस्थापक आणि अध्यक्ष, अमेरिकन युट्युबर जे ब्रेवर यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी टूथब्रशच्या साहाय्याने त्या बेबी अल्बिनो मगरीची पाठ घासली. पाठ घासल्यावर लगेचच मगरीला गुदगुल्या झाल्या आणि ती मगर आपले तोंड खोलून हसताना दिसली. पाठ घासल्यामुळे तिला खूपच छान वाटत होतं.

या चोरांचा स्वॅगच वेगळा! चालत्या टेम्पोमधून चोरी केले इतके सामान; व्हिडीओ झाला व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जे ब्रेवर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे, ‘कोकोनटला स्क्रब केल्यावर फारच बरे वाटत आहे असं वाटतंय.’ व्हिडीओमध्ये जे ब्रेवर प्राणीसंग्रहालयात कोकोनट नावाच्या अल्बिनो मगरीला हातात घेऊन प्रेमाने साफ करत असताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की ब्रेवर जसे कोकोनटला साफ करू लागतात तसे ती आपले तोंड उघडते. हे बघून असे वाटते की ती खरोखरच आनंद घेत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४३२ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, नेटकरी या व्हिडिओवर खूप चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत.