बहिरी ससाण्याच्या नजरेतून शिकार निसटणे केवळ अवघडच नाही, तर अशक्य आहे. हा पक्षी नेहमी गटाने शिकार करतो. दोन ते सहाच्या गटाने बहिरी ससाणा शिकारीवर हल्ला चढवतो. हल्ल्यापूर्वी शिकारीला चारही बाजूने घेरतात आणि शिकार करूनच खेळ संपवतात, हे अनेकदा तुम्ही पाहिलं असेल. पण या बहिरी ससाण्यांचा शिकारीचा डाव फसल्याचं कधी पाहिलं नसेल. बहिरी ससाण्यांचा शिकारीचा डाव फसल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून सर्वांच्याच मनात धडकीच भरते. पण पुढे जे काही घडतं हे पाहून प्रत्येकजण सुटकेचा श्वास सोडतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बहिरी ससाण्याची एखादीच शिकार सुटू शकते, असाच एक शिकारीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. शेतात फिरणाऱ्या एका कोंबडीच्या पिल्लाची शिकार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बहिरी ससाण्याने शिकार न करता धूम ठोकली. हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये दिसतं की, कोंबडीची एक पिल्लू शेतातल्या आवारात फिरत असते. मागून एक बहिरी ससाणा अतिशय वेगात उडत येत कोंबडीच्या या पिल्लावर हल्ला करतो. पण या पिल्लाला कदाचित वेगात येणाऱ्या बहिरी ससाण्याच्या हल्ल्याची कल्पना काही सेकंदापूर्वीच आल्यानं पिल्लू सतर्क होतं आणि पळ काढू लागतं. आपल्या पिल्लाचा जीव धोक्यात असलेलं पाहून त्याची आई सुद्धा धडपड करू लागते. पण बहिरी ससाण्याच्या ताकदीपुढे कोंबडी सुद्धा कमजोर ठरते.

हे पाहूर शेतातच असलेली बकरी पुढे धावत येते आणि कोंबडीच्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी थेट बहिरी ससाण्याशी भिडते. बहिरी ससाणा आपल्या हाती लागलेली शिकार फत्ते करण्याच्या प्रयत्नात कोंबडीवर वारंवार वार करू लागतो. कोंबडी आणि तिचं पिल्लू वाचवण्यासाठी बकरी संपूर्ण ताकद पणाला लावते आणि या बहिरी ससाण्याच्या तावडीतून दोघांची सूटका करते. बहिणी ससाण्याची ही शिकार जवळजवळ यशस्वी होणारच होती, पण बकरीने त्याच्या शिकारीचा डाव हाणून पाडला.

आणखी वाचा : Video : सलग पाच मिनिटं एकाच पोजिशनमध्ये बसून तरुणीनं रचला विश्वविक्रम!

आणखी वाचा : Video : नवरीला पाहताच नवरदेव नाचत सुटला! भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल!

बहिरी ससाण्याच्या अयशस्वी शिकारीचा भयंकर व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहूनच धडकी भरते. शिकारीचा असा व्हिडीओ तुम्ही कधीच पहिला नसेल. Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा थरारक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत या व्हिडीओला ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटकरी मंडळी आपले मत शेअर करत कमेंट्सचा अक्षरशः पाऊल पाडलाय. “जेव्हा लोक म्हणतात की प्राण्यांना विचार आणि भावना नसतात, या प्राण्यांना बोलता येत नसलं तरी ते त्यांच्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी मदतीला धावतात.” अशा कमेंट्स या व्हिडीओवर दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hawk attacks chicken at a farm in viral video watch what happened prp
First published on: 18-09-2021 at 18:26 IST