इटलीतील एका प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologist ) डॉक्टरांनी सेक्सद्वारे कॅन्सर बरा करण्याचा दावा केला आहे. यानंतर तो कथित रुग्णासोबत हॉटेलच्या एका खोलीतही पोहोचला. मात्र रंगेहाथ पकडल्यानंतर डॉक्टरांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. आता त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू झाली आहे.वास्तविक, डॉक्टरांची ही कृती तेव्हा समोर आली जेव्हा एका ३३ वर्षीय महिला रुग्णाने एका टीव्ही चॅनलशी संपर्क साधला. तिने सांगितले की डॉक्टरांनी तिच्याशी लैंगिक संबंध ठेवून तिला विषाणूपासून प्रतिकारशक्ती देऊ शकतो, कारण त्याला लस देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डेली मेल’च्या रिपोर्टनुसार, ६० वर्षीय डॉक्टरचे नाव जियोवानी मिनिएलो (Dr. Giovanni Miniello) आहे. त्याने टीव्ही चॅनलने पाठवलेल्या अभिनेत्रीला सांगितले की तिला ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) आहे आणि त्यामुळे कर्करोग होऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितले की तिच्याशी लैंगिक संबंध ठेवून तो तिला विषाणूपासून प्रतिकारशक्ती देऊ शकतो, कारण त्यालालस देण्यात आली आहे.

( हे ही वाचा: मगरमिठी! महाकाय मगरीने मारली महिलेला घट्ट मिठी आणि…बघा Viral Video )

अशी उघड डॉक्टरांची पोल

तो ज्या ‘पेशंट’शी बोलतोय ती खरंतर वृत्तवाहिनीने पाठवलेली अभिनेत्री आहे हे त्याला माहीत नव्हते. तो तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला, त्याच्या सर्व कृती कॅमेऱ्यात रेकॉर्ड नकळत होत होत्या, त्याने कपडे काढले. त्यानंतर टीव्ही चॅनलचे पत्रकार तेथे पोहोचले. यावर डॉक्टर म्हणाले- ‘मी हे माझ्या अभ्यासासाठी करत आहे. मी अनेकांना वाचवले आहे.’ मात्र दुसऱ्याच क्षणी स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याचा पर्दाफाश झाल्याचे समोर आल्याने त्यांला धक्काच बसला.

( हे ही वाचा: व्यक्तीने AK47 ने टेस्ला कारवर झाडल्या गोळ्या; पुढे काय झालं बघा व्हायरल व्हिडीओमध्ये )

( हे ही वाचा: दिल्लीत स्कूटीच्या नंबर प्लेटवरील SEX सीरिजमुळे गदारोळ, तरुणीचं कुटुंब त्रस्त; जाणून घ्या नेमकं काय घडलंय? )

तक्रारदार महिलेने सांगितले की, तिला गर्भवती राहण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी डॉ मिनेल्लो यांच्याशी तिने संपर्क साधला होता. उपचारादरम्यान त्याने मला अयोग्यरित्या स्पर्श केला. पण जेव्हा त्याने आजार बरा करण्याच्या नावाखाली तिच्यावर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला तेव्हा मला आश्चर्य वाटले. शेवटी माध्यमांच्या मदतीने त्याची पोलखोल झाली. या घटनेनंतर आणखी अनेक महिलांनी डॉक्टरांविरोधात तक्रारी केल्या असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: He was offering sex to women to cure cancer doctors black act captured on camera ttg
First published on: 02-12-2021 at 11:31 IST