Viral video: वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. असाच लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ पुण्यातून समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालविण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत असेल, तर अपघात हे होतातच. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. त्यामुळे प्रत्येकानं व्यवस्थित गाडी चालवली पाहिजे. मल्लापुरम जिल्ह्यातील कोट्टाक्कल येथे एका कारने आपल्या बाळासह चालत जाणाऱ्या महिलेला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. हा अपघात इतका भयंकर होता की ही महिला थेट उडून हवेत फेकली गेली आहे. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली, या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे.

हा अपघात कोट्टाक्कलमधील स्वागतामड परिसरात घडला. स्वागतामड येथील बदरिया (३२) तिच्या मुलाला पलाथरा येथील अंगणवाडीत घेऊन जात असताना एका वेगवान कारने त्यांना मागून धडक दिली. या घटनेत मुलगा चमत्कारिकरित्या बचावला. अपघातानंतर अस्वस्थ झालेला मुलगा ताबडतोब त्याच्या आईकडे धावत असल्याचे आणि तिला उठण्यास मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/Delhiite_/status/1917878809010852002

या महिलेच्या चेहऱ्यावर आणि हाडांना दुखापत झाली आहे. तिला गंभीर अवस्थेत कोट्टाक्कल एमआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार, तिला आयसीयूमधून नियमित खोलीत हलवण्यात आले आहे.अपघातग्रस्त कार कल्लयी येथील रहिवाशांची आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की चालकाला गाडी चालवताना झोप लागली असावी, ज्यामुळे हा अपघात झाला असावा.

हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संतापले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “देवा असा अपघात नको रे” तर आणखी एकानं, काय त्या लेकराची अवस्था झाली असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.