आजच्या काळात नोकरी ही अत्यंत महत्त्वाचे गोष्ट आहे. त्यामुळे चांगले शिक्षण घेण्यावर सर्वजण भर देतात. कॉलेजमधून पदवीधर झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला लवकरात लवकर चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजसह. नोकरी मिळले अशी अशा असते. पण फार कमी लोक असतात ज्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नोकरी आणि पगार मिळतो. अनेक वेळा महागड्या महाविद्यालयात लाखो रुपये खर्च करूनही लोकांना छोटी-मोठी नोकरी करून जगावे लागते. अलीकडेच एक्सवर समोर आलेल्या नोकरीच्या जाहिरातीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि पगार पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अमृता सिंग (@puttuboy25)नावाच्या अकाऊंटवरून एक्सवर हा फोटो शेअर केला आहे. व्हायरल फोटोमध्ये मोमो शॉपमध्ये लावलेली नोकरीची जाहिरात दिसत आहे. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की यात विशेष काय? सहाय्यक कर्मचाऱ्याच्या पदासाठी तब्बल २५,००० रुपये पगार मिळेल असे या जाहिरातीमध्ये सांगितले आहे. पगाराचा आकडा पाहून अनेकांना धक्का बसला आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अहो हे स्थानिक मोमो शॉप आजकाल भारतातील सरासरी कॉलेजपेक्षा चांगले पॅकेज देत आहे.”

हेही वाचा – मी धोनीसाठी आली आहे!”, ८२ वर्षीय आजीची सर्वत्र हवा! Viral Video एकदा बघाच

हेही वाचा – वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….

भारतासारख्या देशात आज लोक खुप कष्ट करून शिक्षण पूर्ण करतात जेणेकरून चांगल्या पगाराची नोकरी मिळावे पण भारताची प्रचंड लोकसंख्या आणि नोकऱ्यांची संख्या तुलनेने फार कमी आहे त्यामुळे नोकरीसाठी स्पर्धा खूप जास्त असते. एवढ्या संघर्षानंतर नोकरी मिळाली तर त्या तुलनेने मिळणारा पगार मात्र फारच कमी असतो. एकीकडे चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी लोक संघर्ष करत असताना दुसरीकडे मोमो विक्रेत्याच्या दुकानावरील मदतनीसाला २५००० हजार रुपये पगार दिला जात आहे हे पाहून कोणाहालाही धक्का बसणे सहाजिक आहे. ही जाहिरात पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी मोमो शॉपने ऑफर केलेल्या पॅकेजबद्दल त्यांची निराशा व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकांनी या पदासाठी अर्ज करायला आवडेल, अशी प्रतिक्रियाही दिली. ‘पे पॅकेज’ पचवण्यासाठी इंटरनेट खूप मेहनत घेत असल्याचे दिसते. एकाने लिहिले की, “हे ते वास्तव जे कोणी दाखवत नाही” तर दुसऱ्याने लिहले की,”आधीपासून आमच्या भागातील प्लंबर म्हणतात की, “तो ५०,००० कमावत आहे.” तिसऱ्याने लिहले की, मी फक्त२ वर्षांपूर्वी १० लाखांपासून सुरुवात केली. मोमोच्या दुकानमध्ये काम करायाला पाहिजे होते.