Lions Roaming On Road Video : वन्यप्राण्यांसंबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ते जंगलातील प्राण्यांसंबंधित असतात, तर कधी मानवी वस्तीत शिरलेल्या प्राण्यांसंबंधित असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात सिंहांचा कळप रस्त्यावर मुक्तपणे फिरताना दिसतोय. रहदारीच्या रस्त्यावर सिंहांची अचानक एन्ट्री झाल्याचे पाहून केवळ वाहतूकच थांबली नाही, तर उपस्थित लोकांचीही चांगलीच घाबरगुंडी उडाली. अनेकांना जगतोय की मरतोय, अशी भीती वाटू लागली. हा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजातही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल व्हिडीओत जंगल परिसरातून जाणाऱ्या एका रस्त्यावर वाहनांची ये-जा सुरू आहे. त्याच वेळी सिंहांचा एक मोठा कळप अचानक रस्त्यावर तिथे येतो. एवढ्या मोठ्या संख्येतील सिंहांना पाहून कोणाचाही भीतीने थरकाप होईल.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सिंहांचा एक मोठा कळप अचानक रस्त्यावर आला. त्यावेळी त्या रस्त्यावर वाहनांची ये-जा सुरू होती. पण, तिथे सिंहांचा कळप येताच सर्व वाहतूक थांबली. सिंहांना पाहिल्यावर वाहनांमध्ये बसलेल्या लोकांनाही खूप भीती वाटू लागली. अनेकांनी लगेच आपल्या वाहनांच्या काचा बंद केल्या आणि शांतपणे कारमध्ये बसून राहिले. यावेळी कळपातील सिंह-सिंहीण वाहनातील लोकांकडे पाहत पुढे जाऊ लागले. एकाच वेळी इतक्या सिंहांना पाहून लोकही खूप घाबरले; पण सुदैवाने कळपातील सिंहांनी त्यांना कोणतीही दुखापत केली नाही. पण त्यांच्या एन्ट्रीमुळे काही वेळ रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला, तर हजारो लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले, “हा व्हिडिओ एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा दिसतोय; पण ते वास्तव आहे.” त्याच वेळी दुसऱ्या युजरने लिहिले, “सिंहांचा इतका आत्मविश्वास पाहून मजा आली; पण मानवी वस्ती असलेल्या भागात त्यांची उपस्थिती चिंतेची बाब आहे.”