एखाद्या गाडीची चोरी करण्यासाठी चोर डुप्लिकेट चावी किंवा फोडाफोडीचे तंत्र वापरतात. पण, दोन चोरांनी हे फंडे न वापरता रिले बॉक्सच्या साह्यानं सिग्नल वापरून आलिशान गाडीची चोरी केली. ‘ब्रिटन वेस्ट मिडलँड’ पोलिसांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या चोरीचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
भारतात आलेल्या इव्हांका ट्रम्प यांना मोदींनी दिली स्पेशल भेट
Video : जळगावच्या या ‘सिक्रेट सुपरस्टार’साठी एक लाईक तर बनतोच ना!
अवजड उपकरणं हलवण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्याचा वापर करून मर्सिडिजच्या हाय-टेक प्रणालीला मूर्ख बनवत चोरांनी घरासमोरून गाडी चोरून नेली. रिले बॉक्सचा वापर करून गाडी चोरण्याच्या चोरांच्या या कल्पनेने पोलिसही चक्रावून गेले आहेत. या चोरांनी गाडीच्या काचा फोडल्या नाही किंवा दरवाजाही उघडण्याचा प्रयत्न केला नाही फक्त ६० सेकंदाच्या अवधीत रिले बॉक्समधल्या सिग्नल प्रणालीचा वापर करून त्यांनी गाडी सुरू केली. मालकाला काही कळायच्या आत या दोन्ही चोरांनी गाडी घरासमोरून पळवून नेली. घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात हायटेक चोरीची ही घटना कैद झाली आहे.