बदलत्या काळानुसार लोक नवनवीन शोध लावून जगाला चकित करत आहेत. यात वाहन क्षेत्रात सातत्याने नवीन बदल पाहायला मिळतात. अगदी बाईकपासून मोठ्या बसेस किंवा ट्रकमध्ये अनेक दर्जेदार, आधुनिक सुविधा पाहायला मिळतात. वाहन क्षेत्रातील या नव्या शोधातून आता आधुनिक सेवा-सुविधांनी सुसज्ज असलेली लक्झरी मोटर होम तयार होत आहे. लक्झरी बससारख्या दिसणाऱ्या वाहनात मुंबईतील एक १ बीएचके फ्लॅटमध्ये जितक्या सेवा-सुविधा असतात, त्या सर्व सुविधा पाहायला मिळत आहेत. दरम्यान, भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनाही याच वाहनाने भुरळ घातली आहे. कदाचित भविष्यात महिंद्रा कंपनी अशा वाहनांची निर्मिती करील असे संकेत त्यांनी दिले आहेत. आनंद महिंद्रांनी अशा लक्झरी आरव्ही मोटार होमचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

यातून आनंद महिंद्रा यांनी भारतासाठी काही प्रमाणात नवीन असलेल्या या वाहन संकल्पनेविषयीचे असलेले त्यांचे आकर्षण स्पष्ट केले आहे. दरम्यान, recreational vehicle (RV) हे पश्चिमेकडील देशांमध्ये दीर्घकाळापासून प्रसिद्ध आहे. अशा प्रकारच्या वाहनातून मुक्तपणे प्रवास करता येतो, जी रस्त्यावरून जात असतानाही लोकांना घरातील सुखसोईंचा अनुभव देतात. सध्या भारतात अशा प्रकारच्या वाहनांची क्रेझ हळूहळू वाढत आहे.

Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा
Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video

महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडीओत लक्झरी RV दिसतेय, जी शहरातील फ्लॅट्समधील आरामदायी अनुभव आणि जागेला सहज टक्कर देऊ शकते; वीकेंडला शहरापासून दूर जाण्यासाठी अशा प्रकारच्या वाहनांचा उपयोग केला जातो. RV या वाहनामधून प्रवास करताना तुम्हाला तुमच्या घरासारखं फिलिंग मिळू शकते. त्याच्या आत आलिशान सोफा, झोपण्यासाठी आरामदायी बेड, एक पूर्ण सुसज्ज स्वयंपाकघर आणि अगदी बाथरूमदेखील आहे. रोमांचकारी प्रवास आणि घरातील सुखसोईंची सांगड घालणाऱ्या वाहनाची ही एक झलक आहे.

आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, कदाचित महिंद्रा ट्रक्स @MahindraTrukBus आणि Mahindra Lifespaces @life_spaces यांच्यातील सहकार्याचे असे परिणाम दिसू शकतात.

आनंद महिंद्रा यांची ही पोस्ट केवळ RV वाहन संस्कृती भारतात आणण्यात त्यांचे स्वारस्य असल्याचे दर्शवित नाही, तर त्यांची कंपनी भविष्यात अशा नव्या संकल्पनांवर काम करेल हे संकेत देणारी आहे. त्यांनी महिंद्रा ट्रक्स आणि महिंद्रा लाइफस्पेसेस यांच्यातील सहकार्याने भारतीय बाजारपेठेसाठी अशा प्रकारच्या लक्झरी RVs ची एक लाइन तयार करण्यासंदर्भातील संकेत दिले आहेत.

अनेकांनी हे वाहन पाहिल्यानंतर फार अद्भुत संकल्पना असल्याचे म्हटले आहे. एका युजरने, हे वाहन मुंबईतील वन बीएचके फ्लॅटचे कॉम्पॅक्ट असल्याचे म्हटले आहे, तर अनेक युजर्सनी या अनोख्या वाहनाची किंमत विचारली आहे.