सध्या ‘चेनस्मोकर्स’ या डीजे जोडगोळीचा दबदबा आहे. त्यांच्या क्लोझर, डोंट लेट मी डाऊन, आणि ‘कबिरा’चं त्यांचं व्हर्जन तुफान लोकप्रिय ठरलंय. शहरांमध्ये कुठल्याही पबमध्ये किंवा कॅफेमध्ये ही गाणी सारखी लागलेली दिसतात. इंग्लिश म्युझिक चॅनल्सवर तर ही गाणी सतत लागलेली दिसतात. यंग क्राऊडमध्ये तर ही गाणी जाम फेमस आहेत. या सगळ्या धीम्या पण रोमँटिक गाण्यांच्या म्युझिक व्हिडिओमध्ये तरूणाईला आपलं प्रतिबिंब दिसतं. या गाण्यांच्या नावावरून ही गाणी कदाचित लक्षात येणार नाहीत पण त्यांची चाल कानावर पडली की ही गाणी कुठेतरी एेकल्यासारखी चटकन लक्षात येतात. पहा ‘क्लोझर’ या गाण्याचा व्हिडिओ

सौजन्य- यूट्यूब

पाहिलंत ओरिजनल गाणं? आता यापुढे हे  प्रकरण पहा

 

याचंपण सौजन्य-यूट्यूब

आपल्या गाण्याने सगळ्यांना नकोसं करणारा हा नासिर खान पाकिस्तानमधला आहे. आपल्या फॅन्ससाठी आपण हे गाणं म्हणत असल्याचं त्याने हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकताना म्हटलंय! त्या फेसबुक पेजवर १ लाखापेक्षा जास्त लाईक्स आहेत! हे लाईक्स त्याच्या फॅन्सपेक्षा ‘काय करतोय पाहुया’ या विचाराने हसून बेजार झालेल्यांचे हे लाईक्स वाटत आहेत…

नासिरच्या ‘गायकी’मुळे ‘ट्विटर’ फुटलं.

 

 

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.