गडद अंधाऱ्या रात्री पांढरी साडी नेसून एक बाई आकाशात झोका घेताना तुम्हाला दिसली तर…..भीती वाटेल ना! आपल्याला जी कल्पनाही करावी वाटत नाही अशी गोष्ट कोल्हापूरात घडत आहे. सोशल मीडियावर कोल्हापूरातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक बाई एका उंच झोक्यावर पांढरी साडी नेसून बसलेली दिसत आहे आणि आरामात झुला झुलते आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या काळजात धडकी भरत आहे. तुमचे हृदय नाजूक असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू नका. पण या व्हायरल व्हिडीओमागील सत्य मात्र वेगळेच आहे.

पांढरी साडी नेसून झोका झुलतीये ही बाई

व्हायरल व्हिडीओमध्ये एक बाई पांढरी साडी नेसून उंचावर लटकवलेल्या झोक्यावर बसून झोका घेताना दिसत आहे. रात्रीच्या वेळी हे दृश्य पाहून कोणालाही भीती वाटेल. भिती काय एखाद्याला हॉर्ट अॅटकही येऊ शकतो. हा काही भुताखेताचा प्रकार नाही. हा व्हिडिओ कोल्हापुरातील आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेली पांढरी साडी नेसलेली बाई ही खोटी आहे. तो एका बाईसारखा दिसणारा पुतळा आहे. खरंतर हे कोल्हापुरातील गणपती मंडळाने साकरलेला देखावा आहे. कोल्हापुरातील बावडा परिसरातील हा देखावा साकरण्यात आला आहे. हा देखावा आहे समजल्यानंतर नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. असा देखावा कोणी कधीही पाहिला नसेल. कोल्हापूरचे लोक कधी काय करती हे सांगतात येत नाही.

हेही वाचा – चिमुकल्याचा मराठमोळा स्वॅग! डोळ्यांवर गॉगल अन् कंबरेला ढोल बांधून वादन करतोय छोटा वादक, पाहा Viral Video

व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” बावड्यामधील गणपतीनिमित्त केलेला हा देखावा कल्पने पलीडकडील आहे. तसेच “कोल्हापूर बावाडामध्ये रात्री एक नंतर फिरू नये” असे सांगितले आहे.

हेही वाचा – यालाच म्हणतात,”मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…!”, दिव्यांग मित्राच्या मदतीला धावून आला चिमुकला, निस्वार्थ मैत्रीचा Video Viral

हेही वाचा – महेश बाबू अन् श्रीलीलाला ‘या तरुणींनी दिली टक्कर! साडी नेसून केला भन्नाट डान्स, Video होतोय तुफान Viral

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे. व्हिडीओवर कमेट करत अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकाने लिहले, “बाई, एखाद्याला हार्ट अटॅक यायचा”

दुसरा म्हणाला,” बाई काय वागाल्यास(वागत आहेस), तुझ्या अशा वागण्याने गल्लीतील बारकी पोरं घराबाहेर येईनात (येत नाही)”

तिसरा म्हणाला की, “कसबा बावडा पिंजार गल्ली”

चौथा म्हणाला, “विषय खतरनात आहे”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचवा म्हणाला, “हा सजीव देखावा पाहून कोणीतरी निर्जीव होईल”