वजन ही गोष्ट आहे जी वाढली तरी टेन्शन येतं आणि कमी झालं तरी. वजन कमी असेल असेल तर लोक म्हणणार, ”अरेरे किती बारीक आहेत तू, काहीतरी खात जा. खाशील तर (जाड) होशील” तर दुसरीकडे वजन जास्त असेल तरीही लोक म्हणणार, ”अरे किती खाशील. जरा कमी खा म्हणजे जरा बारीक होशील.” वजन कितीही असले तरी लोक हे टोमणे मारतातचं. पण, कोणालाही त्याच्या वजनावरुन त्याला बोलणे, टोमणे मारणे, टिंगल करणे हे नैतिकदृष्ट्या अत्यंत चुकीचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वजनावरुन टीका टिप्पणी करणे हे भारतात आपण सर्रास पाहात असतो पण असाच काहीचा प्रकार आता युएसमधील एका रेस्टॉरेंटमध्ये देखील घडला आहे. येथील हार्ट अटॅक ग्रिल नावाच्या रेस्टॉरंटला वजन जास्त असणाऱ्या लोकांना मोफत अन्न देण्याच्या ऑफरमुळे लोकांच्या असंतोषाला सामोरे जावे लागत आहे.

जास्त वजन असलेल्यांना मोफन अन्न देण्याची रेस्टॉरंटने दिली ऑफर


जास्त वजन असलेले लोक मोफत अन्न मिळविण्यास आपण पात्र आहोत की नाही हे जाणून घेण्यासाठी लास वेगासमधील या हॉटेलच्या बाहेर लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. टीक टॉक आणि इतर सोशल मिडियावर या रेस्टरंटचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

व्हायरल व्हिडिओनुसार, १५८ किंवा त्यापेक्षा जास्त वजन असलेली कोणतीही व्यक्ती या ऑफरसाठी पात्र असल्याचा दावा करु शकतात.

रेस्टॉरंटवर झाली टीका

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच, सोशल मीडियावर जगभरातील लोकांनी रेस्टॉरंटची धोकादायक ऑफर आणि इतर हानीकारक सेवांबद्दल टीका केली.

एका युजरने लिहिले की, “फक्त अमेरिकेत तुमच्यासाठी ‘हार्ट अटॅक ग्रिल’ नावाचे रेस्टॉरंट असेल. तुमचे वजन 350 पौंडांपेक्षा (158 kg) जास्त असल्यास, तुम्ही मोफत खाऊ शकता. आणि तुम्हाला खारवून वाळवलेल्या डुकराच्या मांसाचे 40 तुकडे असलेला एक बर्गर मिळेल…हा काय फालतूपणा आहे? त्यामुळेच अनेक अमेरिकन लोक लठ्ठपणाने ग्रस्त आहेत आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी गगनाला भिडली आहे.”

“यूएसियन सभ्यतेतील सर्वात मोठा गुन्हा – कमीतकमी चार संरक्षकांना लठ्ठपणामुळे मारण्यासाठी लास वेगासचा ‘हार्ट अटॅक ग्रिल’ जबाबदार आहे. ते 20,000 कॅलरीजचे ‘ऑक्टोपल बायपास बर्गर’ इतर वस्तूंबरोबर विकतात,” असेही तो म्हणाला.

मायक्रोब्लॉगिंग साइटवर एका वापरकर्त्याने लिहिले, “हार्ट अटॅक ग्रिलचे अस्तित्व माझ्यासाठी त्रासदायक आणि मन हेलावून टाकणारे आहे.

Heart Health: दीर्घकालीन हृदयविकार टाळण्यासाठी 4 आवश्यक स्वयंपाक पद्धती


रेस्टॉरंटची हॉस्पिटल थीम ठरली वादग्रस्त


२००५ मध्ये सुरु झालेले हे रेस्टॉरंट त्यांच्या जास्त कॅलरीज असलेल्या आणि आरोग्यादायी नसलेल्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. एका विवादास्पद हॉस्पिटल थीमसह, ते त्याच्या ग्राहकांना रुग्ण म्हणून संबोधतात तर त्यांचे वेटर्स डॉक्टर्स म्हणून आणि वेट्रेस परिचारिकासारखे कपडे परिधान करतात. एवढे पुरेसे नाही म्हणून की काय, ग्राहकांनी ऑर्डर दिल्यानंतर त्यांच्या हॉस्पिटलच्या गाऊनमध्ये बदल करणेही अपेक्षित आहे.

त्यांच्या काही पदार्थांमध्ये सिंगल बायपास बर्गर, ऑक्टोपल बायपास बर्गर, फ्लॅटलाइनर फ्राईज आणि बटरफॅट मिल्कशेक्स यांचा समावेश होतो. त्यांचे खाद्यपदार्थ “सिंगल,” “डबल,” “ट्रिपल,” “क्वॉड्रपल,” “क्विंटपल,” “सेक्स्टपल,” “सेप्टुपल,” आणि अगदी “ऑक्टोपल बायपास” ऑर्डरमध्ये उपलब्ध आहेत. मुळात असे अन्नपदार्थ वारंवार खाल्ले तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. जे रूग्ण त्यांचे जेवण पूर्ण करू शकत नाहीत त्यांना क्रूरपणे मारहाण केली जाते, ट्रिपल किंवा क्वाड्रपल बायपास बर्गर पूर्ण केल्याने जेवण करणार्‍यांना व्हीलचेअरवर बसवण्याची आणि त्यांच्या वैयक्तिक परिचारिकेद्वारे त्यांच्या वाहनाकडे नेण्याची संधी दिली जाते.

ही ‘Dry Dating’ची काय भानगड आहे बुवा? तरुणाईमध्ये एवढा का प्रसिद्ध आहे ट्रेंड, जाणून घ्या

वादग्रस्त गोष्टींमुळे रेस्टॉरंटची होते भरभराट

या रेस्टॉरंटद्वारे दिल्या जाणार्‍या खाद्यपदार्थाच्या सेवनाच्या संदर्भात मृत्यू आणि आरोग्याच्या समस्या उदभवल्याच्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या आहेत. वारंवार टीका आणि तक्रारी असूनही, हार्ट अटॅक ग्रिल मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून वादग्रस्त गोष्टींमुळेच भरभराटीला येते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hospital themed restaurant heart attack grill in us criticised for offering free meals to customers over 158 kgs snk
First published on: 15-03-2023 at 16:37 IST