Hottest Cities in India: ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी रविवारी नवी मुंबईतल्या खारघरमध्ये मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्री उपस्थित होते. केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हा जंगी कार्यक्रम सुमारे चार ते पाच तास सुरु होता. कार्यक्रमाला आप्पासाहेबांचे हजारो अनुयायी हजर होते. घटनास्थळी छप्परची व्यवस्था नसल्याने त्या अनुयायांना संपूर्ण वेळ उन्हात बसावे लागले. कडक उन्हामुळे तेथे बसलेल्या ११ जणांचा मृत्यू झाला. ४२ अंश सेल्सिअस तापमानात उष्माघाताने अनेकजण बेशुद्ध पडले. या प्रकरणाआधीच हवामानखात्याने देशातील विविध ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. यावरुन देशामध्ये उष्णतेची लाट आली असल्याचे स्पष्ट होत आहे.

मागील काही वर्षांच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी उन्हाचा तडाखा जास्त प्रमाणात बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उन्हाच्या प्रभावामुळे लोकांना जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रसह पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश, सिक्कीम, झारखंड, ओडिसा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये वातावरण अधिक तापले असल्याची माहिती समोर आली आहे. याउलट मंगळवारी जम्मू काश्मीर, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये उष्णतेचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पश्चिमेकडील वातावरणात झालेल्या बदलांमुळे या तीन राज्यांमध्ये वादळ येऊ शकते असेही म्हटले जात होते.

March 2024, March 2024 Records Hottest Temperatures, March 2024 Records Hottest in 175 Years, hottes march 2024 globally, Global Average Temperatures Up by 1.35°C, heat, summer march, summer season
यंदाचा मार्च आजवरचा सर्वांत उष्ण; पश्चिमी झंझावाताचा भारताला दिलासा
Will climate change be key issue in this years election What do youth think
विश्लेषण : यंदाच्या निवडणुकीत हवामान बदल हा कळीचा मुद्दा ठरेल का? तरुणाईला काय वाटते?
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?

१७ एप्रिल भारतातील सर्वात तापमान असलेली शहरं

  • भूपालपल्ली आणि प्रयागराज (44.6 °C)
  • बारीपाडा (44.2 °C),
  • झाशी (43.6 °C)
  • बौध (43.5 °C)
  • डाल्टनगंज (43.4 °C)
  • झारसुगुडा (43.4 °C)
  • पाटणा (43.2 °C)
  • खजुराहो (43.2 °C)
  • संबलपूर (43.2 °C)
  • श्रीनिकेतन (43.2 °C)

आणखी वाचा – उष्माघात म्हणजे काय? उन्हाची तीव्रता आरोग्यासाठी हानिकारक का ठरते?

भारतीय हवामान विभाग (IMD) या विभागाद्वारे हवामानासंबंधितची ही माहिती देण्यात आली आहे.